शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासक हे राष्ट्रवादीचेच पाप

By admin | Updated: June 27, 2015 00:14 IST

संजय घाटगे : व्हन्नाळी येथे बाजार समिती निवडणूक प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा

साके : बाजार समितीच्या जागा आणि बोळ विकून खाणारेच या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्हा बँक आणि बाजार समितीवर आलेला प्रशासक हे राष्ट्रवादीचेच पाप आहे, असा थेट हल्लाबोल माजी आमदार संजय घाटगे यांनी केला. शिव-शाहू आघाडीचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते व्हन्नाळी (ता. कागल) येथे बाजार समिती निवडणुकीसंदर्भात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती श्रीकांत लोहार होते. घाटगे म्हणाले, ‘स्वत:च्या स्वार्थापलीकडे मुश्रीफ यांना काहीच दिसत नाही. आमच्या राजकीय जीवनात आम्ही जे बोललो त्याच्याशी प्रामाणिक राहत आलो आहोत. मुश्रीफ यांच्यासारखे सतराजणांना झुलवत ठेवले नाही. त्यामुळे संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखालील शिव-शाहू आघाडीच या निवडणुकीत मुश्रीफांच्या खोटारडेपणाचे पानिपत करेल. त्यांना खरंच बँक सुधारायची असेल, तर स्वत:चे आणि त्यांच्या बगलबच्चांचे कर्तृत्व आणि चारित्र्य सुधारावे,’ असा सल्लाही त्यांनी दिला. बाजार मालाला रास्त भाव मिळावा आणि शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी, या उद्देशाने बाजार समितीची स्थापना झाली असताना दुर्दैवाने कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार या ठिकाणी झाला आहे. त्यामुळे गट-तट न बघता अशा लुटारू टोळीला मज्जाव करा. ‘गोकुळ’चे संचालक अमरिश घाटगे म्हणाले, आतापर्यंत सत्तेच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बळावर आपण लढत आलो आहोत. आता संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य वंचितांना न्याय मिळवून देण्याचे काम करू, तर योजनेचे अध्यक्ष धनराज घाटगे यांनी गट-तट न बघता खऱ्याखुऱ्या लाभार्थ्याला वेळच्यावेळी न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य ए. वाय. पाटील, अशोक दाभोळे, आर. के. कुंभार, बी. आर, कांबळे, तानाजी हेगडे, एम. बी. पाटील, शामराव पोवार, मधुकर लोहार, आदी उपस्थित होते.