शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बहिरेवाडीच्या वारणा संस्थेवर प्रशासक

By admin | Updated: January 25, 2016 01:05 IST

शेतकऱ्यांची अडवणूक भोवली : पदभार स्वीकारण्यास प्रशासकांची टाळाटाळ

कोल्हापूर : बहिरेवाडी-जाखले (ता. पन्हाळा) येथील वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्यात आले. संस्थेशी संबंधित तीन शेतकऱ्यांना पाणीपुरवठा न केल्याबद्दल साहाय्यक निबंधकांनी ही कारवाई केली असली तरी अद्याप राजकीय दबावामुळे प्रशासक म्हणून पदभार घेण्यास एस. व्ही. शिंदे यांच्यासह इतर सदस्य टाळाटाळ करीत असल्याची तक्रार संबंधित शेतकरी करीत आहेत. वारणा पाणीपुरवठा संस्थेतून माणिक निकम, सागर चौगुले, आदी शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता; पण या शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना ऊस घातल्याचे कारण पुढे करीत त्यांना दोन महिन्यांपासून पाणीच दिलेले नाही. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पन्हाळ्याचे साहाय्यक निबंधक सुजय येजरे यांच्याकडे तक्रारी केली. त्यांनी संबंधित संस्थाचालकांना कारणे दाखवा नोटिसा काढून खुलासा मागितला; पण संस्थेने साहाय्यक निबंधकांच्या नोटिसीला केराची टोपली दाखविली. त्यानंतर येजरे यांनी तुमचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक का नेमू नये, अशी नोटीस लागू केली; पण तिलाही संचालकांनी दाद दिली नाही. अखेर ११ जानेवारी २०१६रोजी साहाय्यक निबंधक सुजय येजरे यांनी पाणीपुरवठा संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करीत प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली असून, अध्यक्ष एस. व्ही. शिंदे, तर सदस्य म्हणून उपलेखापरीक्षक आर. डी. कुलकर्णी यांची नियुक्ती केली. याविरोधात संस्थाचालकांनी विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांच्याकडे अपील केले. त्यांनी साहाय्यक निबंधकांचे आदेश कायम ठेवत २ फेबु्रवारीला सुनावणी ठेवली आहे. तरीही प्रशासक शिंदे यांनी पदभार स्वीकारू नये, यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २ फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.