कोल्हापूर : शहरातील पूरबाधित परिसरात मिळकतींचे नुकसान झाले आहे. जिल्हा व महापालिका प्रशासनाने अशा मिळकतींचा पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. रामानंदर पूरबाधित परिसरात गुरुवारी सुरू असलेल्या पंचनाम्याच्या कामाची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली. यावेळी उपशहर अभियंता एन.एस. पाटील उपस्थित होते.
सन २०१९ च्या पंचनाम्याबाबत काही तक्रारी आल्या होत्या. यावेळी पंचनाम्यामध्ये असा प्रकार होऊ नये याची दक्षता घ्या. पंचनामा करताना जिओटॅग फोटो, त्यांचे शुटिंग, आवश्ययक ती कागदपत्रे जागेवरच घ्यावीत. पंचनामा करताना समक्ष जागेवर खातरजमा करून माहिती भरावी, अशा सूचना प्रशासक बलकवडे यांनी पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. नागरिकांनीही पंचनाम्याला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्य माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
फोटो क्रमांक - २९०७२०२१-कोल-केएमसी सर्व्हे
ओळ - कोल्हापुरात महापुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पंचनामे सुरू असताना भेट दिली. यावेळी उपशहर अभियंता एन. एस. पाटील उपस्थित होते.