शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

प्रशासन सज्ज; उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:08 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होत आहे. निवडणूक अधिकारी व ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होत आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज, सोमवारी दुपारपर्यंत प्रशिक्षण देऊन मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे पाठविले जाईल. ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक क्षेत्रीय अधिकाºयाकडे एक ईव्हीएम मशीनचा संच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळपासून कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ‘ईव्हीएम’, ‘व्हीव्हीपॅट’सह मतदान साहित्य द्यायला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यानंतर हे साहित्य घेऊन मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी आपापल्या केंद्रांकडे रवाना होणार आहेत. पहिल्या व दुसºया टप्प्यातील मतदानावेळी दोन ते तीन टक्के ईव्हीएम मशीन बंद पडली आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये व झाल्यास त्याला परिणामकारकरीत्या सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. याकरिता क्षेत्रीय अधिकाºयांसोबत एक ‘ईव्हीएम’चा सेट दिला जाणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील डोंगरी भागातील काही ठिकाणे निश्चित केली असून, त्या ठिकाणी अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी नेमले आहेत. त्यांच्या वाहनावर ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात येणार असून, त्यांच्याकडे ‘ईव्हीएम’मशीन दिली जाणार आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूर ‘ईव्हीएम’ कंट्रोल रूम बनविण्यात आली आहे. तसेच डोंगरी भागातील मशीनमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी ‘ईसीईएल’कंपनीचे इंजिनिअर सज्ज ठेवण्यात आले आहेत.ते पुढे म्हणाले, मतदानानंतर मतदान यंत्रे ठेवण्यासाठी कोल्हापूर मतदारसंघातील स्ट्रॉँगरूम (सुरक्षा कक्ष) रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे व हातकणंगले मतदारसंघातील राजाराम तलाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे गोदाम येथे तयार करण्यात आले आहे. येथे प्रत्येकी ३२ सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर राहणार आहे. याच्या सुरक्षेची जबाबदारी सेंट्रल पोलीस फोर्सकडे देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील दुसºया रिंगणाची जबाबदारी ‘एसआरपीएफ’कडे असणार आहे. एक महिनाभर या ठिकाणी दिवसातून सकाळ-संध्याकाळ उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांकडून तपासणी होणार आहे. ते सीसीटीव्हीचे फुटेज व व्हिडीओग्राफरचे रेकॉर्डिंग पाहून व्हिजीट बुकमध्ये आपला शेरा नोंदविणार आहेत. याशिवाय एक महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी २४ तास येथे असतील.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील ४०३ मतदानकेंद्रांवर ‘वेब कास्टिंग’जिल्ह्यातील एकूण केंद्रांपैकी १० टक्के केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ प्रणाली राबविण्यात येणार आहे. ‘सीसीटीव्ही’द्वारे ही प्रक्रिया राबवून मतदानावर लक्ष ठेवले जाणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील २१७ व हातकणंगले मतदारसंघातील १८६ केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ केले जाणार आहे.‘ईव्हीएम’ आणणाºया वाहनांवर ‘जीपीएस’मतदानानंतर ‘ईव्हीएम’ मशीन घेऊन येणाºया प्रत्येक वाहनावर ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात आली आहे. बुधवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता निवडणूक निरीक्षक हे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधींसमवेत पारदर्शीपणे ईव्हीएमसह इतर बाबींची छाननी पूर्ण करतील.