शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी अधिष्ठातांनी हालचाली केल्या गतिमान थोरल्या दवाखान्या’ची घरघर थांबविण्यासाठी सरसावले प्रशासनही

By admin | Updated: May 11, 2014 00:43 IST

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची अखेरची घरघर थांबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सीपीआर बचाव कृती समिती’ने नुकतेच

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची अखेरची घरघर थांबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सीपीआर बचाव कृती समिती’ने नुकतेच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना निवेदन दिले. त्याची दखल घेत स्वत: अधिष्ठाता यांनी सर्व विभागप्रमुखांची नुकतीच बैठक घेतली. यामध्ये तत्काळ गरजेचे असणारे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. सीपीआर रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव आहे. रोज हजारो नागरिकांवर मोफत उपचार केले जातात. वाढत्या रुग्णांना सेवा देताना निधी अपुरा पडत आहे. अत्यावश्यक वस्तू व त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची तत्काळ गरज होती. याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने बर्न विभागातील एअर कंडिशनर तत्काळ दुरुस्त केला आहे.याचबरोबर प्रशासनाच्या अधिकारात जेवढ्या यंत्रणांची तत्काळ दुरुस्ती शक्य आहे, त्या यंत्रणाही लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीपीआर कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातील उपस्थित समस्यांचे निराकरण व यंत्रसामग्री दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सीपीआर प्रशासनाच्यावतीने केला जात आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात यंत्रणाही कामाला लागली आहे. सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हयगय करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचे संकेतही अधिष्ठाता यांनी या बैठकीत दिल्याचे समजते. बहुतांश विभागांतील महत्त्वाची उपकरणे बंद आहेत. ती दुरुस्त करण्यासाठीचे तत्काळ प्रस्तावही आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन, प्रयोगशाळा, रक्त विलगीकरण उपकरण, हृदय शस्त्रक्रिया विभागातील महत्त्वाची उपकरणे, अतिदक्षता विभागातील वातानुकूलन, तसेच हृदय शस्त्रक्रिया विभागातील वातानुकूलन यंत्रणाही बंद अवस्थेत आहे. लिथोट्रिप्सी मशीन, एक्स-रे मशीन, डायलेसिस यंत्रणाही नादुरुस्त आहे, तर अस्थिरोग विभागात स्टील प्लेट व वायरही नाहीत. वैद्यकीय महाविद्यालयाकरिता स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी अधिष्ठातांची तत्काळ कार्यवाही राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथील जागेत हलवावे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी नांदेड येथील नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाची पाहणी अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांनी नुकतीच केली आहे. त्यातील प्लॅन व इस्टिमेटही आणण्यात आले आहेत. याबाबत लवकरच पाठपुरावा करू, असे अधिष्ठाता कोठुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.