शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

अडकूरचे अष्टविनायक मंडळ प्रथम- गणराया अवॉर्ड वितरण समारंभ

By admin | Updated: August 21, 2014 00:25 IST

चंदगड तालुका : ‘एक गाव, एक गणपती’ स्पर्धेत कुर्तनवाडीचे जय हनुमान मंडळ प्रथम

चंदगड : तालुक्यात ‘एक गाव, एक गणपती’ स्पर्धेत कुर्तनवाडीच्या जय हनुमान गणेश व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत अडकूर येथील अष्टविनायक गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या विजयी मंडळांना प्रांताधिकारी विवेक आगवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील, सभापती ज्योती पाटील, उपसभापती देसाई, तहसीलदार बी. आर. माळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.चंदगड येथील रवळनाथ देवालयाच्या सभागृहात चंदगड पोलीस ठाण्याच्यावतीने ‘गणराया अवॉर्ड २०१३’ हा कार्यक्रम झाला. पोलीस निरीक्षक अंगद जाधवर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी प्रांताधिकारी आगवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील, तहसीलदार बी. आर. माळी, विजयकुमार दळवी, माजी पंचायत समिती सदस्य शहाबुद्दीन नाईकवाडी यांनी मनोगत व्यक्त केले.स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे - सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम अष्टविनायक गणेश मंडळ, अडकूर; श्री माणकेश्वर गणेश मंडळ, माणगाव. श्री रवळनाथ गणेश मंडळ हलकर्णी. उत्तेजनार्थ - दुर्गामाता गणेश मंडळ, कुरनूर; तर ‘एक गाव, एक गणपती’ स्पर्धेत प्रथम जय हनुमान गणेश मंडळ, कुर्तनवाडी, सिद्धिविनायक गणेश मंडळ, डुक्करवाडी; अष्टविनायक गणेश मंडळ, जंगमहट्टी; उत्तेजनार्थ - ओंकार गणेश मंडळ, धुमदेवाडी; तर उत्कृष्ट गणपती मूर्तीचा बहुमान रवळनाथ गणेश मंडळ, अडकूर व उत्कृष्ट देखावा - सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, सातवणे या मंडळाने पटकावला. ‘एक गाव, एक गणपती’ स्पर्धेत ४८ व सार्वजनिक गणेश स्पर्धेत तालुक्यातील ५१ मंडळांनी सहभाग घेतला होता.यावेळी सुदाम शांताराम पाटील, पोलीस उपनिरीक्षक घोडके, सरपंच सुजाता सातवणेकर, उपसरपंच सचिन वेल्हाळ, सदस्या अनुराधा पाटील, अण्णा वाटंगी, दिलावर सय्यद, विद्या तावडे, आदींसह सरपंच, पोलीसपाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. हणमंत पाऊसकर, एम. व्ही. कानूरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर नारायण गडकरी यांनी आभार मानले.गणराया अवॉर्ड कार्यक्रमाचा सर्व खर्च मुस्लिम बांधवांनी उचलला. हिंदू-मुस्लिम जातींमध्ये जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी चंदगडमधील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकीचे दर्शन घडविले. या कार्यक्रमाला बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते. मुस्लिम नेते शहाबुद्दीन नाईकवाडी यांनी हिंदंूच्या धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम बांधवांना सहभागी करून घेतल्यास हिंदू-मुस्लिम बांधवांतील सलोखा आणखी दृढ होईल; असेच कार्यक्रम राज्यात इतरत्र व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.