शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर जिल्हाधिकारी अजित पवारांची चौकशी

By admin | Updated: January 3, 2016 01:12 IST

वारणा मिनरल्स खाण प्रकरण : जिल्हाधिकारी शुक्रवारी न्यायालयात अहवाल सादर करणार

कोल्हापूर : येळवण जुगाई (ता. शाहूवाडी) येथील वारणा मिनरल्स या बॉक्साईट प्रकल्पासाठी दिलेली जमीन ही वन विभागाची नसून महसूलचीच आहे, असे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यांच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची उच्च न्यायालयाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. ८) उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी ते याबाबतचा अहवाल सादर करणार आहेत. वारणा मिनरल्स प्रकल्पाबाबत शासनाची भूमिका काय? अशी पत्रकारांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विचारणा केली. यावर जिल्हाधिकारी सैनी यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, वारणा मिनरल्स प्रकल्पाबाबत अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी जे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी आपली चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि. ८) मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. त्यावेळी हा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येळवण जुगाई येथे वारणा मिनरल्स हा खाण प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पासाठी दिलेली जमीन ही महसूलचीच असल्याचे प्रतिज्ञापत्र यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे, तर ही जमीन वन विभागाची असल्याचे राज्य शासनाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे गत सुनावणीवेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन महसूलच्या मालकीची असल्याचे प्रतिज्ञापत्र वारणा मिनरल्स कंपनीच्या वकिलांकडून सादर केले आहे. शासनाची एक बाजू आणि अप्पर अधिकाऱ्यांची एक बाजू असे विरोधाभासाचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्या आधारावर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले यासंदर्भात त्यांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.८) होणाऱ्या अंतिम सुनावणीवेळी याबाबतच वस्तुनिष्ठ अहवाल न्यायालयात सादर करायचा आहे.(प्रतिनिधी