शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

अभिनेता सागर चौगुलेच्या कुटूंबियांना हवा मदतीचा हात

By admin | Updated: March 20, 2017 17:18 IST

कलाकार मित्रमंडळींतर्फे दिले जाणार पन्नास हजार; कलाकाराची विधवा पत्नी म्हणून पेन्शनसह हवी नोकरीची संधी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर,दि. २0 : राजर्षी शाहू महाराजांची भूमिका साकारताना रंगमंचावरुनच एक्झिट घेणारा अभिनेता सागर चौगलेंच्या कुटुंबीयांसाठी अनेकांनी मदत देऊ केली आहे. पण अद्यापही त्यांच्या कुटूंबापर्यंतही मदत पोहचलेली नाही. यात कलाकाराची विधवा पत्नी म्हणून पेन्शनसह नोकरीची संधी त्याचा पत्नीला मिळावी असा सुर कलाकारांकडून उमटू लागला आहे.

पुण्यात राज्य नाट्य स्पर्धेत अग्निदिव्य नाटक सादर करीत असताना रंगमंचावरच सागरचा मृत्यू झाला होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सागरची पत्नी वनिता यांना शासकीय नोकरीत रुजू करण्याचे तसेच त्यांच्या मुलीच्या नावे पाच लाखांच्या रकमेची ठेव ठेवण्याचे आश्वासन दिले आहे .

पालकमंत्री पाटील यांनी घेतलेले दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी लवकर व्हावी, अशी अपेक्षा कलाकारांकडून होत आहे. यासह आमदार राजेश क्षीरसागर यांनी फौंडेशनच्यावतीने दोन लाख रुपयांचा निधी जाहीर केला. हा निधी भगिनी महोत्सवादरम्यान दिला जाणार आहे. तर ह्दयस्पर्शी कलाकार व मित्रमंडळींकडून ५० हजाराची रोख रक्कम लवकरच दिली जाणार आहे. याशिवाय अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडेही इतर कलाकार मंडळीनी विशेष बाब म्हणून सागरच्या पत्नीला अर्थिक मदत द्यावी असा पत्रव्यवहारही केला आहे. त्यामुळे त्याच्या निधनानंतर किरकोळ स्वरुपाची मदत वगळता काहीही मदत कुटूंबियांना झालेली नाही. ज्या लोकराजाने जात , धर्म, भेदांपलिकडे जाऊन बहुजनांना त्यांच्या हक्कांची जाणीव देत त्यांच्या उद्धाराचे कार्य केले. त्या राजर्षी शाहूंची भूमिका साकारण्याचे भाग्य सागरला लाभले. ती साकारताना काळाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याचे कुटूंब उघडयावर पडले. दातृत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या राजर्षींच्या करवीरनगरीत दात्यांनी हात अखडता का घेतला आहे, याचे कोडे मात्र, सागरवर प्रेम करणाऱ्या मंडळींना पडले आहे. ज्या दात्यांना मदतीचा हात द्यावयाचा आहे. त्यांनी सागरच्या पत्नीच्या नावे खाते असलेल्या आयडीबीआय बँकेच्या राजारामपुरी शाखेतील खाते क्रमांक ०६१५१०४०००९०८९० वर थेट मदत देऊ शकता किंवा थेट भेटूनही मदत देता येईल. सागरची कन्या नारायणी हिचा पहिला वाढदिवस २९ एप्रिलला आहे. हा वाढदिवस मोठ्याने साजरा करण्याचा मानस सागरने मित्रमंडळींमध्ये व्यक्त केला होता. मात्र, त्यापुर्वीच सागरवर काळाने झडप घातली. याच दिवशी निवृत्त नायब तहसिलदार अनिल गायकवाड हे सागरच्या कन्येच्या नावाने पोस्टामध्ये सुकन्या योजनेत प्रत्येक वर्षी एक हजार रुपये भरणार आहेत. यासह हनुमान तरुण मंडळ काळाम्मावाडी नाट्यसंस्थेचे स्नेहल संकपाळ, सुनील बाणे, प्रकाश पाटील ही मंडळी सागरच्या कुटूंबियांना शासन व दात्यांकडून मदतीचा हात मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत. कलाकाराची पत्नी म्हणून शासनाच्या प्रचलित परिक्षा, मुलाखत यातून खासबाब म्हणून सुट देऊन सागरच्या पत्नीची नेमणुक जिल्हा प्रशासनात होऊ शकते. परिक्षा, मुलाखत ही प्रक्रीया यासाठी राबविणे शासनावर बंधनकारक नाही. त्यामुळे उपलब्ध ठिकाणावर सागरच्या पत्नीला राज्य शासनाच्या आदेशानूसार जिल्हा प्रशासन थेट लिपीक वर्गीय नियुक्ती देऊ शकते. असे शासकीय नोकरीतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने सांगितले.