इचलकरंजी : आचार्य शांतारामबापू गरुड हे थोर स्वातंत्र्यसैनिक व प्रबोधकांचे प्रबोधक होते. स्वातंत्र्यलढ्याच्या आशय आणि संविधानाची मूल्ये या समर्थ पायावर आधारीत भारताची वाटचाल झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. समाजवादी प्रबोधिनीचे काम वाढत्या लोकसहभागाने अधिक व्यापक करून या विचारधारेशी बांधिलकी असलेल्या प्रत्येकाने सर्व सहकार्य करून ही चळवळ मजबूत करणे हीच शांतारामबापूंना खरी आदरांजली ठरेल, असे मत सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
येथील समाजवादी प्रबोधिनीच्यावतीने आचार्य शांताराम गरुड यांच्या दहाव्या स्मृतीदिनी आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. सुरुवातीला मान्यवरांनी शांतारामबापू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. शशांक बावचकर यांनी शांतारामबापूंच्या कार्यकर्तृत्वाचा व त्याचा आजच्या संदर्भाचा आढावा घेतला. चर्चेत, शांतारामबापूंनी भारतीय संस्कृती, भारतीय तत्वज्ञान, गांधीवाद, लोकशाही समाजवाद, आंबेडकरवाद यासह सर्व विचारधारांचे नेमके प्रशिक्षण व समकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्याचे आकलन कार्यकर्त्यांना व्हावे यावर भर दिला. यावेळी जयकुमार कोले, प्रा. रमेश लवटे, पांडुरंग पिसे, अन्वर पटेल, शिवाजी शिंदे, दयानंद लिपारे, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
०३०९२०२१-आयसीएच-०२
समाजवादी प्रबोधिनीत आचार्य शांतारामबापू गरुड यांच्या दहाव्या स्मृतीदिनीनिमित्त त्यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.