शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यांबाबत ठेकेदारावर कारवाई, सोमवारपासून होणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर : दायित्व कालावधीतील रस्ते खराब झाले असतील तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गुरुवारी महानगरपालिका अतिरिक्त ...

कोल्हापूर : दायित्व कालावधीतील रस्ते खराब झाले असतील तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गुरुवारी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ई-वॉर्ड लोककल्याण व संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास दिले. शहरातील खराब रस्त्यांचे सोमवारपासून पंचनामे करण्याचा तसेच त्याची सुरुवात राजारामपुरीतून करण्याचा शब्दही त्यांनी दिला.

संघर्ष समितीचे शिष्टमंडळ गुरुवारी महापालिका अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी शहरातील खराब रस्त्यांबाबत शिष्टमंडळाने प्रशासनाचे लक्ष वेधले. शिष्टमंडळात ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, अनिल कदम, अनिल घाडगे, किशोर घाडगे, महादेव पाटील, श्रीकांत भोसले, किशोर माने, अमर निंबाळकर यांचा समावेश होता.

शहरातील ७५० किलोमीटर रस्त्यापैकी ३०० रस्ते आजही चांगले आहेत, बाकीचे रस्ते खराब झाले आहेत. याचाच अर्थ जे रस्ते खराब झाले ते मुळातच निकृष्ट दर्जाचे होते. आयआरबी रस्त्यांची दर पाच वर्षांनी दुरुस्ती होणे अपेक्षित असताना ती झाली नाही. तसेच आयआरबीने केलेल्या रस्त्याकडेच्या गटारी गेल्या दहा वर्षांत स्वच्छ केलेली नाहीत. त्यामुळे त्यातून तुंबणारे पाणी रस्त्यावर येते आणि रस्ते खराब होतात, असे बाबा इंदूलकर यांनी सांगितले.

मागच्या दोन वर्षांत नव्याने केलेल्या रस्त्यांची तपासणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी व्हावी, दायित्व कालावधीतील खराब रस्ते ठेकेदाराकडून दुरुस्त करून घ्यावेत, या कामाच्या तपासणीत शास्त्रीयदृष्ट्या तफावत आढळल्यास संबंधित ठेकेदारावरही फौजदारी गुन्हा दाखल करावा, आयआरबी रस्त्यांची दुरुस्ती, साफसफाई करून घ्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या मागण्यांबाबत येत्या आठ दिवसांत प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही तर दि. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी महापालिकेसमोर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा तसेच १४ ऑगस्ट रोजी शहर अभियंता यांना रिक्षात बसवून शहरातील खड्ड्यांचे दर्शन घडविणार असल्याचा इशाराही संघर्ष समितीतर्फे देण्यात आला.

फोटो क्रमांक - २९०७२०२१-कोल-रोड मिटींग

ओळ - कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांबाबत ई-वॉर्ड लोककल्याण व संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याशी चर्चा केली.