शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 9, 2016 23:00 IST

२७ हजारांचा दंड : नाशिकरोड मनपाची मोहीम

नाशिकरोड : परिसरात पाण्याचा अपव्यय करणाऱ्या १४१ जणांना मनपा विभागीय कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, ५४ जणांकडून २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना रहिवाशांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जातो. पाण्याची टाकी भरून वाहणे, अंगणात सडा मारणे, पाईप लावून गाडी धुणे, नळातून जादा पाणी खेचण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावणे आदि पद्धतीने पाण्याची नासाडी केली जात आहे. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय पाणीपुरवठा, घरपट्टी, पाणीपट्टी या तीनही विभागांचे दहा जणांचे पथक गेल्या दहा दिवसांपासून नाशिकरोड परिसरात तपासणी मोहीम राबवित आहे. या तपासणीमध्ये पाण्याची विविध प्रकारे नासाडी करणाऱ्या एकूण १४१ जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या तर २२ इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या होत्या. तीन दिवसांत आर्थिक दंड न भरल्यास कायमस्वरूपी पाणी कनेक्शन बंद करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर नोटिसा दिलेल्यांपैकी ५४ जणांनी एकूण २७ हजार रुपये दंड भरला आहे. दंड भरल्यानंतर पुन्हा इलेक्ट्रिक मोटारीचा वापर करणार नाही, असे लेखी लिहून दिल्यानंतर काही मोटारी पुन्हा देण्यात आल्या. मनपा प्रशासनाकडून पाण्याच्या नासाडीबाबत सर्व स्तरांवर कठोर मोहीम राबविण्याची गरज आहे. वास्तविक फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र जागोजागी बघायला मिळत आहे.