शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात ब्रेक द चेन आदेश लागू असून, याअंतर्गत सुरू असलेल्या संचारबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, नियमांचे उल्लंघन ...

कोल्हापूर : जिल्ह्यात ब्रेक द चेन आदेश लागू असून, याअंतर्गत सुरू असलेल्या संचारबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले. वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास दुकाने बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून विनाकारण होणारी हालचाल थांबवली पाहिजे. नियम न पाळणाऱ्या दुकानांवर तसेच व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास दुकान बंद करा.

अत्यावश्यक सेवेशी निगडित उद्योग, निर्यातक्षम उद्योग, सातत्याने प्रक्रिया असणारा उद्योग आणि कामगार राहत असलेल्या उद्योगाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तेथे कर्मचारी पॉझिटिव्ह सापडला तर उद्योग बंद करून ते निर्जंतुकीकरण करून इतर कर्मचाऱ्यांची चाचणी करावी.

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी माने म्हणाले, गावात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण हवे. पॉझिटिव्ह रुग्णांची यादी सरपंच, ग्रामसेवक यांना द्यावी. त्यामुळे रुग्ण घराबाहेर फिरणार नाहीत याची दक्षता घेता येईल.

पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, इचलकरंजीमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर चांगली कारवाई झाली आहे. अशीच कारवाई अन्य ठिकाणीही होणे अपेक्षित आहे. सध्या यात्रांचे दिवस सुरू होत असून, त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, सर्वसामान्य गरिबांना कारवाईचा त्रास होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही सर्वांनी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. कचरा उचलणे, साफसफाई, निर्जंतुकीकरण यावरही भर हवा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

--

फोटो नं १६०४२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.