शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर हुल्लडबाजी केल्यास कारवाई जिल्हा पोलीसप्रमुख : कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर

By admin | Updated: May 16, 2014 00:41 IST

कोल्हापूर : लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणूक मतमोजणीच्या निकालानंतर हुल्लडबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

 कोल्हापूर : लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणूक मतमोजणीच्या निकालानंतर हुल्लडबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कार्यकर्त्यांनी निकालानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कायद्याचे पालन न करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिला आहे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी उद्या, शुक्रवारी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात ७०० पोलीस व राज्य राखीव दलाचे १०० जवान लक्ष ठेवून असतील. मतमोजणी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथील प्रत्येक व्यक्तीची हालचाल कॅमेराबद्ध होणार आहे. साध्या वेशातही पोलिसांची पथके या परिसरात लक्ष ठेवून असणार आहेत. हुल्लडबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिसांना दिले आहेत. काँग्रेस, महायुती, आप, शेकाप, अपक्ष, आदी पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची वेगवेगळी सोय करण्यात आली आहे. नागरिकांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होऊ नये, यासाठी शासकीय तंत्रनिकेतन मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पहाटे सहा ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरात मी स्वत: लक्ष ठेवून असणार आहे, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)