शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांशी हुज्जत घालणाऱ्या ‘सभापतीं’वर कारवाई करावी

By admin | Updated: September 25, 2016 01:24 IST

सुनील कदम : कक्षातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी

कोल्हापूर : महानगरपालिकेत आयुक्तांशी हमरीतुमरी करण्याचा स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्याकडून घडलेला प्रकार निंदनीय आहे. आयुक्त कार्यालयात घडलेल्या प्रकाराबाबतचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, विभागीय सचिव, विशेष पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याची माहिती माजी महापौर व ताराराणी आघाडीचे नेते सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर दंडुकशाही सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. महापालिकेत शुक्रवारी आयुक्त कक्षात स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना दमदाटी करून हमरीतुमरीचा प्रकार केल्याचे वृत्त घडल्याबाबत सुनील कदम यांनी निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी सभापती मुरलीधर जाधव यांनी हुज्जत घातली. त्यावेळी आयुक्तांनी सभापती जाधव यांना ‘गेट आऊट’ म्हणून कक्षातून बाहेर काढले. असा प्रकार कोल्हापूरच्या दृष्टीने लाजिरवाणा आहे. सभापतींनी अधिकाऱ्यांच्या कक्षात न जाता कामाची तक्रार महापौरांकडे करणे अपेक्षित आहे. सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीमुळे चांगले अधिकारी सेवानिवृत्ती घेत आहेत. यापूर्वी अधिकाऱ्यांची खुर्ची उचलणे, अधिकाऱ्यांचे अपहरण करणे, अधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप लावणे, दमदाटी करणे, आदी प्रकार घडूनही त्याबाबत कोणतीच कारवाई केलेली नाही. अधिकाऱ्यांना होत असलेल्या दादागिरीमुळे कोल्हापूर शहराची प्रतिमा राज्यात डागाळत आहे, असाही आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या या दंडुकशाहीबद्दल ताराराणी-भाजप आघाडी संघर्ष करीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, विभागीय सचिव यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. आयुक्तांच्या कक्षात घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्यांच्यावर कारवाईची मागणी विशेष पोलिस महानिरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याचेही कदम यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, शेखर कुसाळे, अशिष ढवळे, किरण शिराळे, ईश्वर परमार, किरण नकाते, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) सत्ताधारी नेत्यांचे आरोप दिशाभूल करणारे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दोन नेत्यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन ताराराणी-भाजप आघाडीच्या सदस्यांची कामे प्रशासक करतात असे आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही कोणतीही कामे बेकायदेशीर केलेली नाहीत. केली असतील ती त्यांनी दाखवून द्यावीत. दोन जबाबदार माजी मंत्र्यांनी असे दिशाभूल करणारे वक्तव्य करणे चुकीचे आहे. काय घडले आयुक्त कार्यालयात? स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव शुक्रवारी दुपारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यालयात गेले होते. शहरातील स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटची काही कामे रद्द झाली असून, त्याचा निधी शिल्लक राहिला आहे. हा निधी अन्य विकासकामांकडे वळविण्यात येणार आहे. प्रशासनाने कोणती कामे करायची याचा प्रस्ताव करून तो मंजुरीला दिला होता. तो मंजूरही झाला, परंतु सर्व निधी माझ्या भागातच खर्च करा, असा आग्रह जाधव यांनी धरला होता. परंतु आयुक्तांनी, जर तसे करायचे असेल तर प्रशासनाच्या प्रस्तावास उपसूचना देऊन बदल करावा. दिलेला प्रस्ताव मी बदलणार नाही, असे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या जाधव यांनी आयुक्तांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी माझ्या कार्यालयात येऊन मला मोठ्याने बोलण्याचे कारण नाही. तुम्ही कार्यालयातून निघून जा, अशा शब्दांत आयुक्तांनी त्यांना बजावले. दोघांमधील वाद विकोपाला गेला. दोघेही बोलणे थांबवत नाहीत म्हटल्यावर शेवटी लेखापाल संजय सरनाईक यांनी प्रसंग ओळखून जाधव यांना समजावत, शांत होण्याची विनंती करीत बाहेर नेले.