तुरंबे
: गोकूळचा जिल्ह्यात म्हैस दुधाचे उत्पन्नवाढीसाठी ॲक्शन प्लॅन तयार आहे. सर्वांच्या मदतीतून म्हैस दुधाची वाढ करणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
मजरे कासारवाडा,(ता. राधानगरी) येथे ग्रामस्थांच्यावतीने गोकूळ दुधाच्या खरेदी दरात वाढ दिल्याबद्दल नेते सतेज पाटील यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए.वाय. पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, गोकूळमार्फत दूध उत्पादकांना दिल्या जाणारी वैद्यकीय सेवा योग्य मिळते की नाही, तसेच गोकूळचा सुपरवायझर संस्थांना भेटी देतो का याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त सर्वसामान्य सभासदांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी उपसरपंच दिगंबर किल्लेदार यांनी स्वागत केले. सुनील जितकर यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार बिद्री साखर कारखान्याचे संचालक युवराज वारके यांच्या हस्ते करण्यात आला. दिलीप वारके, अरुण वारके, राजू जाधव, संकेत वारके, अनिल वारके, प्रितेश वारके, विठ्ठल फराकटे, विलास चव्हाण, संतोष जितकर, मारुती फराकटे, दिगंबर जितकर उपस्थित होते. अशोक जितकर यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद खोत यांनी आभार मानले.
फोटो ओळी- मजरे कासारवाडा येथे पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार करताना बिद्री साखर कारखान्याचे संचालक युवराज वारके, शेजारी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील.