शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई केवळ एकावर

By admin | Updated: August 7, 2014 00:23 IST

कीटकनाशकांची १५६० दुकाने : तपासणी अहवालावर शंका

सांगली : जिल्ह्यात कीटकनाशक औषध विक्रेत्यांची एक हजार ५६० दुकाने असून, त्यांच्याकडून बोगस कीटकनाशके शेतकऱ्यांना विक्री होऊ नयेत म्हणून ३२ गुणनियंत्रकांची नियुक्ती केली आहे. या गुणनियंत्रकांनी चार महिन्यात केवळ ४२ नमुने काढले असून त्यापैकी एकाच कंपनीचे कीटकनाशक अप्रमाणित आल्याचे खुद्द जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी आणि कीटकनाशक कंपन्यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही केल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.एका सामाजिक संस्थेने बोगस कीटकनाशकांची सर्वाधिक विक्री सांगलीत होत आहे, बोगस कंपन्यांकडून कशा पध्दतीने कीटकनाशकांची विक्री होते याची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग मोहिते आदींना उपस्थित केले होते. यावेळी प्रा. डॉ. मोहिते म्हणाले की, बोगस कीटकनाशकांमुळे राज्याच्या महसूलचा तोटा होत आहेच, शिवाय बोगस कीटकनाशकांना आकर्षक नावे देऊन ती शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कृषी महाविद्यालयाचे अधिकारीच बोगस कीटकनाशकांवर सडेतोडपणे बोलू लागल्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. सामाजिक संस्थेने आपल्याला कशासाठी बोलाविले आहे आणि समोर बसलेल्यांना काय माहिती द्यायची, याचीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हती. त्यामुळे अचानक उपस्थित शेतकऱ्यांना कोणती माहिती द्यायची, याबाबत अधिकाऱ्यांना काहीच कळत नव्हते. अखेर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जमदाडे यांनी, जिल्ह्यात एक हजार ५६० कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या असून त्यापैकी ४१६ विक्रेत्यांची तपासणी केली असून एका कंपनीचे कीटकनाशक अप्रमाणित आले आहे. संबंधित कंपनीवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सांगली जिल्ह्यात महिना सात ते आठ कोटी रुपयांच्या कीटकनाशकांची विक्री होत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)