शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल न देणाऱ्या संस्थांवर कारवाई

By admin | Updated: February 14, 2017 23:53 IST

दोष-दुरुस्ती : आढावा बैठकीत बाळासाहेब यादव यांचा इशारा; ५१६० संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण

कोल्हापूर : लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटींचा दुरुस्ती अहवाल वेळेत सादर न करणाऱ्या संस्थांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव यांनी दिला. जिल्ह्यातील प्रमाणित लेखापरीक्षक व सनदी लेखापालांची मंगळवारी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये सन २०१५-१६ या कालावधीतील लेखापरीक्षण, दोष-दुरुस्ती अहवाल व सन २०१६-१७ कालावधीतील लेखापरीक्षणा- बाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्यासह साडेचारशे लेखापरीक्षक उपस्थित होते. सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणानंतर दुग्धवगळता ६०२८ संस्था अस्तित्वात असून, सन २०१५-१६ या कालावधीतील ५१६३ संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित संस्थांचे लेखापरीक्षण का राहिले, याबाबतची माहिती बाळासाहेब यादव व अरुण काकडे यांनी घेतली. ठराव मागवून नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांचे बऱ्यापैकी काम पूर्ण झाले असून आदेश काढलेल्या संस्थांचे काम थोडे मागे राहिल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. केवळ लेखापरीक्षण पूर्ण होऊन चालणार नाही, तर त्यातील निघालेल्या दोषांची दुरूस्ती अहवाल तत्काळ सादर करण्याची सूचनाही दिली. कायद्याने तीन महिन्यांच्या आत हा अहवाल देणे बंधनकारक आहे. आठ दिवसांत जे अहवाल देणार नाही, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशारा यादव यांनी दिला. आगामी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ६०७८ संस्थांचे लेखापरीक्षण करावे लागणार आहे. त्यापैकी ५३०९ संस्थांचे ठराव तर ४७६ संस्थांचे लेखापरीक्षणाबाबत आदेश काढले आहेत. या कालावधीतील लेखापरीक्षण जुलै २०१७ पर्यंत १०० टक्के करण्याची सूचनाही बाळासाहेब यादव यांनी दिली. गैरव्यवहार : संबधितांवर फौजदारीएप्रिल २०१६ पर्यंत लेखापरीक्षणात सात संस्थांत ५ कोटी १० लाखांचा गैरव्यवहार आढळला होता. याबाबत संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. या सातपैकी पाच गैरव्यवहार सनदी लेखापालांनी तर दोन प्रमाणित लेखापरीक्षकांनी उघडकीस आणले. याबद्दल प्रमाणित लेखापरीक्षक तेली व श्रीकांत चौगले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.