शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मटका छापणाऱ्या वृत्तपत्रांवर कारवाई

By admin | Updated: October 26, 2015 00:50 IST

राम शिंदे : राज्यातून मटका-जुगार हद्दपार करण्याचा गृहविभागाचा निर्णय

कोल्हापूर : राज्यातून मटका-जुगारासह अवैध धंदे हद्दपार करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू राहतील, त्या ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच मटका छापणाऱ्या वृत्तपत्रांवर त्यांच्या मुद्रणस्वातंत्र्यावर बाधा येणार नाही, याचा विचार करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री प्रा. शिंदे हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत. त्यातूनही कोठे अवैध धंदे सुरू राहतील तर त्या जिल्ह्याच्या पोलीसप्रमुखासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्यातून मटका-जुगार हद्दपार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मटका छापणाऱ्या वृत्तपत्रांवरही त्यांच्या मुद्रणस्वातंत्र्यावर बाधा येणार नाही, याचा विचार करून कारवाई करण्याचे आदेशही पोलीस प्रशासनास दिले असल्याचे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)दादांनी दिलेले उमेदवार स्वच्छ महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीमध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेले काही उमेदवार गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे उमेदवार तुम्हाला कसे चालतात? या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रा. शिंदे यांनी दादांनी स्वच्छ व चारित्र्यसंपन्न उमेदवारच निवडले असल्याचे सांगितले. डिसेंबरमध्ये पोलीस भरती पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी डिसेंबरमध्ये २० हजार पोलीस शिपाई पदांसाठी भरती होत आहे. ती पाच टप्प्यांत होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पानसरे हत्येच्या तपासासंदर्भात मौन ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात माहिती विचारली असता प्रा. शिंदे यांनी, तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यावर काही भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे सांगितले. साहित्यिकांनी पुरस्कार परत करू नयेत; सूचना कराव्यातशासनाने दिलेले पुरस्कार साहित्यिक परत करू लागले आहेत. ते त्यांनी परत करू नयेत. काही सूचना असतील तर त्या कराव्यात, त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.