माणगाववाडी ता. हातकणंगले येथे अवैधरित्या दारू उत्पादन व विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क आणि हातकणंगले पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये ४,७०० लीटर कच्चे रसायन, ९५० लीटर तयार गावठी दारू,५० लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या, २५० पत्र्याचे डबे असा २ लाख ८८ हजार २६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला. या कारवाईमध्ये अभिजीत सुभाष कांबळे , किशोर भीमराव आवळे, शिवाजी मारुती खोत सर्व रा. माणगाववाडी या संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चौकट,
तीन आठवड्यापूर्वी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून माणगाववाडी येथे धाडी टाकून मोठ्या प्रमाणात दारू,कच्चे रसायन आणि हातभट्ट्या उदध्वस्त केल्या होत्या. त्यावेळीही हातभट्टी चालक पळून गेले होते. त्याच भट्टी चालकांनी पुन्हा पंधरा दिवसात नव्याने भट्ट्या उभारून नेटाने व्यवसाय सुरु केले होते. शुक्रवारच्या धाडी मध्ये पुन्हा भट्टी चालक नेहमीप्रमाणे पळून जाण्यात यशस्वी झाल्याने पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फोटो= माणगाववाडी येथे हातभट्टी दारु अड्डे उदध्वस्त करताना पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्कचे कर्मचारी.