कुरुंदवाड : घरगुती थकीत वीज ग्राहकांची महावितरणकडून वीज कनेक्शन्स तोडली जात असल्याच्या निषेधार्थ शिरढोण (ता. शिरोळ) येथील महावितरण कार्यालयासमोर अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने गुरुवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दुपारी सहायक अभियंता सिकंदर मुल्ला यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज न तोडण्याचा तसेच मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने आंदोलन मागे घेतले. आंदोलनाचे नेतृत्व सुरेश सासणे व विश्वास बालीघाटे यांनी केले. वीज महावितरण कंपनीने घरगुती थकबाकीदार वीज ग्राहकांची सक्तीची वसुली सुरू केली आहे. थकबाकीदारांची वीज कनेक्शन्स तोडली जात असल्याने याला विरोध करण्यासाठी अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने येथील माळभागावरील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. अधिकारी मुल्ला यांनी वीजबिल माफीबाबत शासन निर्णय होईपर्यंत ऑक्टोबरनंतरची वीजबिले भरण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी रविवारी ग्रामस्थांची सभा घेऊन याबाबत निर्णय देणार असल्याचे सांगितले.
आंदोलनात शाबुद्दीन टाकवडे, विजय सूर्यवंशी, चंद्रकांत चव्हाण, कुमार पाटील, सचिन मालगावे, दत्तात्रय लाळगे, हैदराबादअली मुजावर, महादेव सूर्यवंशी सहभागी झाले होते.
फोटो - १८०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथे अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने सहायक अभियंता सिकंदर मुल्ला यांना निवेदन देण्यात आले.