शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीस कृती समितीचा विरोध

By admin | Updated: May 27, 2015 00:58 IST

तीव्र आंदोलन : जूनमध्ये घेणार मेळावा

कोल्हापूर : शहर विकासाचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाढत्या शहरीकरणात उपनगरांच्या समस्या सोडविण्यात प्रशासनास यश आलेले नाही. महापालिका प्रशासनाने निमंत्रण दिल्यास बाजू मांडण्यासाठी कार्यशाळेला उपस्थित राहणार. मात्र, हद्दवाढीविरोधी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी माजी आमदार संपतराव पवार यांच्या उपस्थितीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती हद्दवाढविरोधी कृती समितीचे समन्वयक नाथाजी पोवार यांनी ‘लोकमत’ला दिली.महानगरपालिकेने उपनगरांसह शहरात काय विकास केला आहे, हे आतापर्यंत ग्रामीण जनतेने पाहिले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय घेऊ दिला जाणार नाही. एखादा निर्णय घेताना जनमानसाच्या भावनेचा विचार न करता तो लादण्याचा प्रयत्न केल्याने टोलसारखे भूत जनतेच्या मानेवर बसण्याची शक्यता आहे. आताही तीच चूक महापालिक ा व शासन पुन्हा करू पाहत आहे. ग्रामीण जनतेचा विरोध असताना त्यांना कायद्याचे भय दाखवून शहरात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी किंवा तत्सम योजनांच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी फक्त हद्दवाढ हाच निकष नाही. शहर विकासासाठी शासनाने सढळ हाताने निधी द्यावा, हद्दवाढीची टूम काढू नये, अशी प्रतिक्रिया कृती समितीच्या सदस्यांतून उमटत आहे. मागील वेळेप्रमाणेच यावेळीही संभावित गावांच्या अकृषक रोजगाराची टक्केवारी चुकीची सादर केली असण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहेत. तिथे शेतीपूरक व्यवसाय आहेत. ग्रामीण भागात घरबांधणी परवाना पाचशे रुपयांना मिळतो. महापालिकेत त्यासाठी ५० हजार मोजावे लागतात. ग्रामीण जनतेला ओरबाडण्यासाठीच हद्दवाढ करणार का? जनभावनेचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. शहराचा विकास झाला पाहिजे; पण ग्रामीण जनतेला कोणी वेठीस धरू पाहत असेल, तर त्याविरोधात जनआंदोलन उभारले जाईल. प्रसंगी कायदेशीर लढाईची तयारीही कृती समितीने केली असल्याचे नाथाजी पोवार व ‘भोगावती’चे माजी संचालक बी. ए. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)