शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळाचे कामकाज कृती समितीने दिवसभर रोखले

By admin | Updated: December 31, 2015 00:16 IST

भालचंद्र कुलकर्णी : धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत १२ डिसेंबरला संपली असून, धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकारही राहिलेला नाही; म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीने बुधवारी दिवसभर महामंडळाचे कार्यालयीन कामकाज रोखून धरत कार्यालयातच ठिय्या मारला. विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्याने पदाधिकाऱ्यांना महामंडळाच्या घटनेप्रमाणे कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. होऊ घातलेला ‘चित्रभूषण पुरस्कार’ हाही घटनाबाह्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च येणार आहे. हा कार्यक्रम घेतल्यास तो सर्व खर्च विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या नावावर टाकून त्यांच्याकडून वसूल करावा. याशिवाय मुदत संपल्यानंतर ६ जानेवारी २०१६ ची महासभा होऊ शकत नाही. यापूर्वीच दोन सर्वसाधारण सभा घेणे अपेक्षित होते. याबाबत धर्मादाय आयुक्तांनी ताशेरेही ओढले आहेत. अशा पद्धतीने बेकायदेशीर कारभार सुरू आहे. याचबरोबर विद्यमान उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याकडे तत्कालीन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सात लाख ३४ हजार ३६३ रुपयांची रक्कम दिली असताना ती अष्टेकर यांनी कार्यालयाकडे का भरली नाही? मुंबई कार्यालयातील अकौंटंट, संगणक आॅपरेटर, शाखा व्यवस्थापक यांना त्यांच्यावरील आरोप अजूनही सिद्ध झाला नसतानाही कामावरून का कमी केले? नाडगौंडा व चिंडक यानी तयार केलेला फेरलेखापरीक्षण अहवाल सभासदांकरिता जाहीर करावा. याचबरोबर सर्वसाधारण सभेचे नियोजन ठरलेल्या तारखेलाच करावे. ही सभाही धर्मादाय आयुक्त किंवा उपायुक्त यांच्या अधिकाराखालीच संयोजित करावी. यासह अन्य मागण्या करीत त्यांनी महामंडळाचे कामकाज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रोखून धरले. यावेळी कृती समितीने निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर हे कार्यालयात दिवसभर उपस्थित नव्हते. यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले, मुदत संपल्यानंतर कुठलाही धोरणात्मक निर्णय विद्यमान संचालकांना घेता येणार नाही. त्यामुळे महासभाही धर्मादाय आयुक्तांच्या संयोजनाखाली घ्यावी. यावेळी सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलवडे, अभिनेत्री छाया सांगावकर, हेमसुवर्णा मिरजकर, केशव पंदारे, मधुकर वाघे, बबिता काकडे, मंगला साखरे-विधाते, बापू घराळ, श्रद्धा पवार, अशोक जाधव, उषा माने, धनंजय पंडित, विलास मोरबाळे, अर्चना दार्इंगडे, विवेक कोरडे, मंगेश मंगेशकर उपस्थित होते.