शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

कोल्हापूर जिल्ह्यात कारवाईचा धडाका

By admin | Updated: October 7, 2014 00:03 IST

विधानसभा निवडणुक : २२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १०८६ जणांना समन्स

एकनाथ पाटील - कोल्हापूर- निवडणुका शांततेत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली. प्रतिबंधात्मक कारवाई आणि खबरदारी म्हणून परवाना असलेली शस्त्रेही जमा केली आहेत. आतापर्यंत तब्बल २२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, १०८६ जणांना समन्स व वॉरंट बजावण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक शांततेमध्ये पार पडली होती. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. विधानसभा निवडणूकही शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात तीन-चार उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे पोलिसांचीही कसोटी लागणार आहे. पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात परवाना असलेली २२६५ शस्त्रे जमा केली आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यापासून बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी इचलकरंजी येथील दोघांना अटक करून दोन रिव्हॉल्व्हर व सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. शहरात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत व निवडणुकीमध्ये शांतता भंग करण्याची शक्यता आहे, अशा २२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये १२ जणांवर ‘एमपीडीए’ लावण्यात आला आहे. पोलिसांनी फरार आरोपींची नावेही प्रसिद्ध केली असृन, दारूबंदी, जुगारासह आचारसंहिता भंगाची कारवाईही जोमाने सुरू केली आहे. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी) बाहेरील गुन्हेगारांवर टेहळणी राज्यातील सर्व हद्दपार गुन्हेगारांची यादी प्रत्येक पोलीस ठाण्याला आॅनलाईन पाठविण्यात आली आहे. कोल्हापूर सोडून बाहेरील जिल्ह्यातील हद्दपार झालेले गुंड कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर विशेष ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा व गोपनीय विभागाला सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संपूर्ण निवडणुकीचा बंदोबस्त सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे. सीमारेषेवर खडा पहारामहाराष्ट्र-कर्नाटक भागांत असलेल्या तिलारी, गगनबावडा, दाजीपूर, हिटणी, आजरा या पाच नाक्यांवर दोन अधिकाऱ्यांसह आठ ते दहा शस्त्रधारी पोलीस रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत. कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. बनावट नोटांवर विशेष लक्ष निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात बनावट नोटा चलनात आणून अशिक्षित, गोरगरीब मतदारांना फसविण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता असल्याने विशेषत: पोलीस प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतली आहे. नाकाबंदी...गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. या पार्श्वभूमीवर वाहनांची कागदपत्रे,तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली जात आहे. मद्य प्राशन करून गाड्या रेस करणे, कर्कश आवाज, नंबरप्लेट व वाहन परवाना नसलेल्या वाहनधारकांवर कठोर कारवाई केली जात आहे. निवडणुकीच्या वेळी एसआरपीची तुकडी व इतर सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जमा केलेली परवानाधारकशस्त्रे : २२६५समन्स व वॉरंट : १०८६तडीपार : २२७दारूबंदी : १०३ छापे,१२८ आरोपींना अटक जुगार : २३ छापे,९४ आरोपींना अटक आचारसंहिता भंग गुन्हे : १३ बेकायदेशीर हत्यार : १ छापा,२ आरोपी अटक एकूण मतदारसंघ : ३१९०संवेदनशील मतदारसंघ : १२९उपद्रवी मतदारसंघ : ३