याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुशिरे येथील केर्ली जोतिबा मार्गावर एका कंपनीमार्फत पाण्याच्या टाकीचे उत्पादन केले जात आहे. या कंपनीने नामांकित कंपनीच्या नावात साम्य असल्यासारखे नाव दिले आहे. ही माहिती नामांकित कंपनीस मिळाल्याने त्यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबतची सत्यता पडताळणीकरिता न्यायालयाने लोकल कमिशनरची नियुक्ती केली होती. या कमिशनरच्या पथकाने गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करून सुमारे पाच लाख रुपयांच्या साधनसामुग्री मशीन व इतर साहित्य सील केले तसेच हा कारखानाही सील करण्यात आला आहे. हा कारखाना सुमारे सात-आठ वर्षांपासून चालू आहे. या कारवाईत कंपनीचे लीगल ॲडव्हायझर नवकार, नम्रता जैन, आशिष विश्वकर्मा, विजय सोनी आदी उपस्थित होते. कोडोली पोलीस ठाण्याच्या पोलिसाच्ंया समक्ष ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सागर पोवार, नामदेव सुतार, संभाजी खटाळ, सागर कुंभार हे उपस्थित होते
टीप. :
नामवंत कंपनी .. प्लास्टो अशी आहे तर कारवाई झालेल्या कंपनीचे नाव लॉस्टोलाईन असे आहे