शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

corona virus Kolhapur : विनामास्क प्रकरणी ४०९ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 12:08 IST

corona virus Kolhapur : लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर सोमवारी पहिल्या दिवशीच नागरिकांची रस्त्यावर झुंबड उडाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या ४०९ जणांवर तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७६५ दुचाकींवर पोलिसांनी कारवाई केली.

ठळक मुद्देविनामास्क प्रकरणी ४०९ जणांवर कारवाईलॉकडाऊनचा झटका : १७६५ दुचाकींवर कारवाई

कोल्हापूर : लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर सोमवारी पहिल्या दिवशीच नागरिकांची रस्त्यावर झुंबड उडाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या ४०९ जणांवर तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७६५ दुचाकींवर पोलिसांनी कारवाई केली.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत आठवडाभर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केले होते. त्यानंतर सोमवारपासून काहीअंशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. याचा गैरफायदा घेऊन विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्या सुमारे ४०९ जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत ९४ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.

त्याशिवाय मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या १६८६ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सुमारे २ लाख ९९ हजार ६०० रुपये दंड बसवला. तसेच अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्या ७७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून अस्थापना सुरू ठेवणाऱ्या ७७ जणांकडून एकूण ८२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. मॉर्निंग वॉक करणाऱ्या ५३ जणांकडून २२ हजार १०० रुपये दंड वसूल केला.विनामास्कप्रकरणी ४६ लाख, मॉर्निंग वॉकचा पावणेनऊ लाख रुपये दंडदि. ४ ते २४ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात विनामास्कप्रकरणी २० हजार ६४७ जणांकडून ४६ लाख ३ हजार रुपये तर मॉर्निंग वॉकप्रकरणी २४५८ जणांकडून ८ लाख ७७ हजार रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ७७,३०३ वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांना १ कोटी ३२ लाख ५३ हजार रुपये दंड केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर