शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू नियंत्रणअंतर्गत ३८ जणावंर कारवाई-आठ महिन्यांतील चित्र : ५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST

कोल्हापूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ३८ जणांवर कारवाई करीत ५ हजार ४०० ...

कोल्हापूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ३८ जणांवर कारवाई करीत ५ हजार ४०० रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती, प्रबोधन याबरोबरच दंडात्मक कारवाईही करावी. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी गुरुवारी दिले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. प्रभारी जिल्हा सल्लागार चारुशिला कणसे म्हणाल्या, कोटपा कायदा २००३ च्या अंमलबजावणीसाठी पुढील महिन्यात अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध ठिकाणी धाडी घालण्यात येणार आहेत. तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत शाळेपासून १०० यार्ड परिसरात पिवळ्या रंगाचा पट्टा आखण्यात येणार आहे.

यावेळी सर्वांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. प्रल्हाद देवकर यांनी स्वागत केले.

----

एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेली दंड वसुली

विभाग व्यक्तींची संख्या दंड वसुली

आरोग्य : २४ : २ हजार ६००

पोलीस : १३ : २ हजार ६००

अन्न व औषध प्रशासन : १ हजार २००

---

जनजागृती स्पर्धेत प्रियांका लिंगडे राज्यात चौथ्या

महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे तंबाखूमुक्त जनजागृती मोहिमेसाठी आयोजित पोस्टर्स स्पर्धेत तंबाखू नियंत्रण कक्षाच्या डाटा ऑपरेटर प्रियांका लिंगडे यांना चौथ्या क्रमांकासाठी स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मिळाले. तसेच चारुशिला कणसे आणि सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनाही प्रशस्तीपत्र मिळाले. निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

----------

फोटो नं २४१२२०२०-कोल-तंबाखू अभियान

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या हस्ते प्रियांका लिंगडे यांना पारितोषिक देण्यात आले.

----

इंदुमती गणेश