शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २७00 संस्थावर कारवाई

By admin | Updated: March 17, 2016 00:12 IST

अवसायनाचे आदेश : दूध संस्थांबाबत सावध भूमिका

कोल्हापूर : जिल्ह्यातील २७०० सहकारी संस्थांनी आपला गाशा गुंडाळला आहे. सर्वेक्षणात कामकाज बंद असलेल्या संस्थांवर सहकार विभागाने कारवाई केली असून मार्चअखेर अजून किमान ७00 संस्था कायमच्या बंद केल्या जाणार आहेत. सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने आधार देऊन उभे करण्याचे काम सहकारी संस्थांनी केले; पण सहकाराच्या मूळ उद्देशाला बगल देत राजकारणासाठी संस्थांचा वापर सुरू झाल्याने चांगल्या संस्था अडचणीत आल्या आहेत. जिल्हा बँक, दूध संघ, तालुका खरेदी-विक्री संघ, साखर कारखाने यासाठी विकास सेवा संस्था, दूध संस्था, हौसिंग सोसायटी, आदी संस्था स्थापनेचा सपाटा लावला. या संस्थांचा कारभार केवळ कागदावरच राहिल्याने संस्थांच्या संख्येचा आकडा फुगलेला होता. राज्यात ‘महायुती’चे सरकार आले आणि त्यांनी सहकार शुद्धिकरणाची मोहीम हाती घेतली. सप्टेंबरअखेर सर्व संस्थांचे सर्वेक्षण करून अहवाल आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ८७०१ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये जवळपास ३३०० संस्था बंद, कार्यस्थगित व ठावठिकाणा नसलेल्या आढळल्या. संबंधित संस्थांना ‘आपणाला अवसायनात का काढू नये?’ अशा नोटिसा संबंधित तालुका निबंधकांकडून जारी करण्यात आल्या होत्या. याबाबत समाधानकारक खुलासा संबधित संस्थांकडून न आल्याने सुमारे २५०० संस्थांना अवसायनात काढण्याच्या अंतिम आदेश सहकार खात्याने जारी केले आहेत. मार्चअखेर उर्वरित संस्थांना आदेश काढण्यात येणार आहेत. सुमारे ८५० संस्थांचा ठावठिकाणा नाहीपशुसंवर्धन, दुग्ध व मत्स व्यवसाय (पदुम) या प्रवर्गातील जवळपास ८५० संस्थांचा ठावठिकाणाच लागत नसल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे. दूध संघांच्या राजकारणाशी या संस्थांचा संबंध येत असल्याने त्यांची नोंदणी रद्द करताना निबंधक कार्यालयाने सावध भूमिका घेतली आहे. या संस्थांनी वेळेत म्हणणे सादर केले नाही तर त्याची नोंदणी रद्द करण्याचे अंतिम आदेश काढले जात आहेत. सुमारे २00 संस्थांचे ‘नोंदणी रद्द’चे अंतिम आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील एकूण संस्थांच्या ३० टक्के संस्था अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश झाले आहेत. संबंधित संस्थांना नोटीस पाठवून म्हणणे सादर करण्यास वेळ देण्यात आला होता, ज्यांचे लेखापरीक्षण पूर्ण नाही, आॅनलाईन नोंदणी केलेली नाही व निवडणुकीची प्रक्रिया राबविलेली नाही. अशा संस्थांवर प्राधान्याने कारवाई करण्यात आली आहे. - अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक