कोल्हापूर : पन्नास रुपये न दिल्याबद्दल तरुणावर अॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना आज, शुक्रवारी शाहूपुरीतील भाजी मार्केट येथे सायंकाळी घडली. या अॅसिड हल्ल्यात विलास गोगे नायडू (वय २८, रा. कळंबा, ता. करवीर) हा भाजीविक्रेता जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.शाहूपुरी भाजी मार्केट येथे सायंकाळी विलास नायडू याच्याबरोबर संशयित मंगेश (भाई) (पूर्ण नाव समजू शकले नाही) याने जागेवरुन वाद घातला. जागा देण्यास नायडूने नकार दिल्याने मंगेश तेथून गेला व पुन्हा साथीदारांसमवेत दुचाकीवरून भाजी मंडईत आला. त्याने नायडूकडे ५० रुपयांची मागणी केली. त्यालाही नायडूने नकार दिल्याने मंगेश व त्याच्या साथीदारांनी नायडूच्या अंगावर अॅसिड फेकले. त्यानंतर संशयित पसार झाले. रात्री उशिरा याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.
५० रुपये न दिल्याबद्दल अॅसिड हल्ला
By admin | Updated: August 2, 2014 00:43 IST