शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘रवी’च्या संचालकांवर दोषारोपपत्र

By admin | Updated: March 18, 2016 00:50 IST

विभागीय उपनिबंधकांकडून कारवाई : कर्मचाऱ्यांचाही समावेश; म्हणणे मांडण्यासाठी ३० मार्च मुदत

कोल्हापूर : चुकीच्या पद्धतीने कर्ज वितरण करून रवी को-आॅपरेटिव्ह बॅँक अडचणीत आणण्यास जबाबदार असणाऱ्या संचालक व कर्मचारी अशा ३३ जणांविरोधात चौकशी अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक (सहकारी संस्था) रंजन लाखे यांनी बुधवारी दोषारोपपत्र बजावले. संबंधितांना म्हणणे मांडण्यासाठी ३० मार्चला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आहे.संचालक मंडळाच्या निष्काळजीपणामुळे बॅँकेचे आर्थिक नुकसान झाले असून, झालेल्या नुकसानीस संचालक मंडळ व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना जबाबदार धरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये कारवाई होणे आवश्यक आहे. बॅँकेची एकूण थकबाकी ८ कोटी ६१ लाख ६७ हजार या रकमेपैकी ५ कोटी ६२ लाख ३७ हजार इतकी थकबाकी कॅश क्रेडिट कर्जाची आहे. ही कर्जे नियमातील अटींचे पालन न करताच व योग्य ती दक्षता न घेता मोठ्या प्रमाणात मंजूर केली आहेत. त्याचबरोबर संचालकांच्या नातेवाइकांची थकबाकी ६६ लाख ७९ हजार असून, त्यांना पुरेसे तारण न घेता व परतफेडीची क्षमता न पाहता मंजूर केली आहेत. याही कर्जास संचालक मंडळ व संबंधित अधिकारी जबाबदार आहेत, असे लेखापरीक्षक यांनी स्पष्ट शेरे दिले आहेत. त्यानुसार बॅँकेचे चौकशी अधिकारी रंजन लाखे यांनी बुधवारी ३३ जणांना दोषारोपपत्र बजावले. बॅँकेने दिलेल्या लेखी अहवालावरून संबंधितांना जबाबदार धरून दोषारोपपत्र दाखल करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून दोषारोपपत्र बजाविण्यात आले आहे. या प्रकरणात कोणाला काही म्हणणे मांडायचे असल्यास, लेखी कागदपत्रे, पुरावा किंवा तोंडी म्हणणे सादर करायचे असल्यास ३० मार्चला सकाळी अकरा वाजता आपल्या कार्यालयात उपस्थित राहावे असे या पत्रात म्हटले आहे. या दोषारोप पत्राने संचालक व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.यांच्यावर दोषारोपपत्र--संचालक : १) बाबूराव पांडुरंग जाधव हे मृत असल्याने वारस अनिल बाबूराव जाधव (रा. शास्त्रीनगर) २) शरद आप्पासो मेढे-पवार हे मृत असल्याने वारस संगीता शरद मेढे-पवार (रा. सोमवार पेठ) ३) आनंदराव गणपतराव पायमल (रा. मंगळवार पेठ) ४) अनिल रंगराव काशीद हे मृत असल्याने वारस कमल रंगराव काशीद (रा. रविवार पेठ) ५) सदाशिव यशवंत कांबळे हे मृत असल्याने वारस श्रावण सचिन कांबळे (रा. रविवार पेठ) ६) जहॉँगीर बादशहा जमादार (रा. रविवार पेठ) ७) जयराम श्रीपतराव पचिंद्रे (रा. रविवार पेठ) ८) महादेवरा रामजी घोडके (रा. लक्ष्मीपुरी) ९) बाजीराव बळवंत डकरे हे मृत असल्याने वारस सुनील बाजीराव डकरे (रा. जाधववाडी) १०) सुमन आत्माराम शेजाळे (रा. वर्षानगर) ११) सुभाष कृष्णा कोराणे (रा. शिवाजी पेठ)१२) सुभाष रामचंद्र जाधव (रा. राजारामपुरी) १३) हरिदास रामकृष्ण सोनवणे (रा. रविवार पेठ) १४) आशालता केशवराव फाळके (रा. रविवार पेठ) १५) कृष्णा गणपती मोरे (रा. प्रतिभानगर) १६) संभाजीराव गणपतराव कदम (रा. भोसलेवाडी)१७) सुधीर रघुनाथ खराडे (रा. रविवार पेठ) १८) बाळासाहेब रामकृष्ण सोनवणे (रा. रविवार पेठ) १९) प्रकाश बाबूराव ठाकूर (रा. कळंबा) २०) महादेव खंडेराव डकमले (रा. रविवार पेठ) २१) तुकाराम माणिकराव तेरदाळकर (रा. कावळा नाका) २२) अजित जयसिंगराव मोरे (रा. आझाद चौक) २३) अब्दुलसत्तार रसुल मुल्ला (रा. यादवनगर) अधिकारी-कर्मचारी :२४) संतोष बाबूराव माने, असिस्टंट मॅनेजर (रा. रविवार पेठ) २५) सुनील श्रीपतराव भांडवले, असिस्टंट मॅनेजर (रा. न्यू शाहूपुरी) २६) नंदकुमार बाजीराव संकपाळ, असिस्टंट मॅनेजर (रा. रविवार पेठ) २७) शिरीष श्रीधर मोरे, असिस्टंट मॅनेजर (रा. रविवार पेठ) २८) सुरेश रामराव शिंदे, शाखाधिकारी (रा. बागल चौक) २९) बाजीराव महिपती जुगदार, शाखाधिकारी (रा. रविवार पेठ) ३०) अजित मारुतीराव शिंदे, शाखाधिकारी हे मृत असल्याने वारस संजीवनी अजित शिंदे (रा. पाचगाव) ३१) मोहन गजाननराव पोवार, शाखाधिकारी (रा. नेहरूनगर) ३२) नजीरअहम्मद अब्दुल तांबोळी (रा. शिवाजी उद्यमनगर) ३३) राजवर्धन दत्तात्रय कुर्डूकर, शाखाधिकारी (रा. पाचगाव)