शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्ड विभक्तीकरणात २५ लाखांचा डल्ला-‘भाकप’चा करवीर पुरवठा विभागावर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 19:21 IST

करवीर पुरवठा विभागात रेशनकार्ड विभक्तीकरणात कार्यालय प्रमुख व पुरवठा निरीक्षक या दोघांनी २५ लाखांचा डल्ला मारला आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी

ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कोल्हापूर : करवीर पुरवठा विभागात रेशनकार्ड विभक्तीकरणात कार्यालय प्रमुख व पुरवठा निरीक्षक या दोघांनी २५ लाखांचा डल्ला मारला आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या समोरच केला. तुमच्या निष्काळजीपणामुळेच अशा एजंटाचे फावले असून, त्यांना निलंबित करून उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, असा आग्रहही धरला. यावर शिंदे यांनी माहिती घेऊन पुढील कार्यवाही करतो, असे सांगितले.

 

‘भाकप’चे नामदेव गावडे, उमा पानसरे, सतीशचंद्र कांबळे, बी. एल. बरगे, वाय. एन. पाटील, स्नेहल कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. गावडे व कांबळे यांनी करवीर तहसीलदार कार्यालयात पुरवठा विभागात सुरू असलेला अनागोंदी कारभार निदर्शनास आणून दिला. आतापर्यंत आमच्या संघटनेने १२ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करून पकडून दिले आहे. तरीदेखील प्रशासनाच्या वरदहस्तामुळे जनतेची पिळवणूक थांबलेली नाही, हे निदर्शनास आणून देताना कंदलगावमधील उदाहरण सांगितले. बाळू राऊ पाटील यांची कन्या राजश्री पिष्टे, रा. केर्ले यांचे रेशनकार्ड विभक्तचे काम कोणत्याही एजंटशिवाय पाटील यांनी पूर्ण केले.

सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही करवीर पुरवठा विभागातील जयवंत तोडकर यांनी अडीच हजार रुपये लाच देण्याची मागणी राऊ पाटील यांच्याकडे केली. पाटील यांनी ‘भाकप’कडे तक्रार दिल्यानंतर तोडकर याला लाचलुचपत विभागाने अटक केली. तरीदेखील करवीर पुरवठा विभागातील कारभार सुधारलेला नाही. यावर शिंदे यासंदर्भात सविस्तर महिती घेऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलक माघारी फिरले. यात सुनीता अमृतसागर, इर्शाद फरास, सुमन पाटील, दिलदार मुजावर, वसंत पाटील यांनी सहभाग घेतला.करवीर पुरवठा विभागातील कार्यालय प्रमुख आदित्य दाभाडे व पुरवठा निरीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी रेशनकार्ड विभक्तीकरणासाठी अडीच रुपयांप्रमाणे पैसे घेणे सुरूच ठेवले आहे. रेशनकार्ड विभक्तीकरणाचे आलेले अर्ज पाहता, ही रक्कम २५ लाखांवर जात असल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीGovernmentसरकार