शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लिंगनूरच्या जवानाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 8, 2015 00:46 IST

एक महिन्याची सुटी संपवून ते महिन्यापूर्वीच ड्यूटीवर गेले. त्यांची ही कुटुंबीयांसोबतची अखेरची भेट ठरली.

गडहिंग्लज : जम्मू-काश्मीर येथील डिगडोल येथे सेवा बजावत असताना लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील जवान सुनील शंकर जोशीलकर (वय ३८) यांचा अपघाती मृत्यू झाला. ते १०९ टी.ए. बटालियनच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नायक रँकवर कार्यरत होते. पहारा देत असताना सूचीपर्णीचा वाळलेला मोठा वृक्ष कोसळल्याने ही घटना घडल्याचे समजते.याबाबत माहिती अशी, जम्मू-श्रीनगर मुख्य मार्गावरील आर्मीच्या गाड्यांवर अतिरेकी हल्ला होऊ नये यासाठी अखंड पहारा असतो. काश्मीर डिगडोल तालुक्यात ‘बॅटरी चष्मा क्रॉस’ या डोंगराळ भागात सुनील पहाऱ्यावर होते. दुपारी सोसाट्याचा वारा सुटून वाळलेले मोठे सूचीपर्णीचे झाड सुनील यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.शवविच्छेदनानंतर पार्थिव आर्मीच्या विमानाने उद्या, गुरुवारी पुणे येथे, तर तेथून आर्मी अ‍ॅम्ब्युलन्सने कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ९) सकाळी शासकीय इतमामात लिंगनूर येथे अंत्यसंस्कार होणार येणार आहेत. (वार्ताहर)सुनील यांची कौटुंबिक पार्श्वभूमीवडील शंकर जोशीलकर हे गडहिंग्लज एस.टी. आगारातून निवृत्त झाले असून, सुनील यांना अन्य दोन भाऊ आहेत. सुनील सर्वांत मोठे होते. मधला भाऊ धनंजय हा पुण्यातील खासगी कंपनीत, तर धाकटा उत्तम हाही सैन्यात असून, जम्मूमध्ये सेवा बजावत आहे. सुनील यांचा विवाह बेलेवाडी येथील संध्या यांच्याशी झाला असून, त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी सोनाली चौथीमध्ये, तर लहान मुलगी सई बालवाडीमध्ये शिकते. सुनील दोन महिन्यांपूर्वी गावी सुटीवर आले होते. एक महिन्याची सुटी संपवून ते महिन्यापूर्वीच ड्यूटीवर गेले. त्यांची ही कुटुंबीयांसोबतची अखेरची भेट ठरली.