शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेवरच ‘अनुदानित’ मध्ये प्रवेश

By admin | Updated: June 26, 2014 00:36 IST

तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या : संपतराव गायकवाड; ‘अकरावी’ प्रवेशाबाबत प्राचार्यांना सूचना

कोल्हापूर : अकरावीसाठी अनुदानित तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावरच प्रवेश देण्यात यावेत. शिवाय प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या, असे आवाहन सहायक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांनी आज, बुधवारी येथे केले.कोल्हापूर शहर वगळता जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत आयोजित प्राचार्यांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण (उच्च) विभागातर्फे राम गणेश गडकरी सभागृहात ही सभा झाली.गायकवाड म्हणाले, अकरावीसाठी तुकडी, तिची क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणातच प्रवेश देण्यात यावेत. महाविद्यालयांतील अनुदानित तुकड्यांमध्ये गुणवत्तेनुसारच प्रवेश व्हावेत. अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलून कमी गुण असलेल्यांना या तुकड्यांत प्रवेश देऊ नका. शिवाय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तुकडीत ढकलू नय, अशा पद्धतीने प्रवेश दिल्यास ते अमान्य करण्यात येतील. सामाजिक, वैधानिक, आदी आरक्षणाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. विनाअुनदानित महाविद्यालयांतील विज्ञानसाठी पाच हजार, वाणिज्यसाठी तीन हजार, तर कलाशाखेसाठी दोन हजार प्रवेश शुल्क निश्चित केले आहे. मात्र, तरीही काही महाविद्यालयांत यापेक्षा जादा शुल्क आकारले जाते. काही ठिकाणी शुल्क नियमाप्रमाणे घेतात, पण पावती देत नाहीत, असे प्रकार होऊ नयेत.या सभेत माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी एस. बी. पाटील, उपशिक्षणाधिकारी पी. टी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक उपनिरीक्षक के. डी. भाट, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. एस. ओतारी, ए. एम. आकुर्डेकर, एस. के. यादव, बी. डी. टोणपे, आर. व्ही. कांबळे, एन. एस. गुरसाळे, आदींसह १५० प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सहायक उपनिरीक्षक सुरेश कोळी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)