शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

३,२२६ विद्यार्थ्यांना प्रवेश

By admin | Updated: June 3, 2016 23:57 IST

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार विविध शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी शुक्रवारी भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात सोडत काढण्यात आली.

सुहास जाधव -- पेठवडगाववडगाव पालिकेच्या आगामी २०१६ च्या निवडणुकीसाठी सत्तारूढ यादव गटाच्या विरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत़ मात्र, नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल़ इच्छुकांच्या भाऊगर्दीत संभाव्य सर्वपक्षीय आघाडी नेत्यांचा कस लागणार आहे़ सत्तारूढ यादव आघाडीचे नेते स्व़ विजयसिंह यादव यांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक होत आहे़ ही निवडणूक नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहेत.२०११ला पालिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर शहरात विकासकामांना गती दिली़ यासाठी माजी मंत्री सतेज पाटील यांनी शहरासाठी निधी उपलब्ध करून दिला, तर गेल्या दीड वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे़ यामधून दोन स्मशानभूमी, जलतरण तलाव, महालक्ष्मी मंदिर सुशोभीकरण, गटर तेथे रस्ता, आदी कामांचे नियोजन केले़ महिलांचे संघटन करण्यासाठी कल्याणी सखी मंचच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनसंपर्कावर भर दिला आहे़ या जमेच्या बाजू असल्या तरी पालिकेच्या नियोजनासाठी स्वयंघोषित कारभाराच्या मनमानी कामामुळे काही नगरसेवक दुरावले आहेत़ या नाराजांची दखल घेत त्यांना बाजूला करण्यात आले आहे़ विद्या पोळ यांच्यासाठी थेट माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ सक्रियपणे सहभागी झाले आहेत़ पोळ यांनी थेट संपर्कावर भर दिला आहे़ यादव गटाची पारंपरिक विरोधी युवक क्रांती आघाडी आहे़ या आघाडीची सूत्रे प्रविता सालपे व रंगराव पाटील-बावडेकर यांच्याकडे आहेत़ विरोधी गटांचे रंगराव पाटील व संतोष गाताडे हे पालिका सभागृहात विविध प्रश्न मांडतात. मात्र, यामधील काही प्रश्नांचा पाठपुरावा झालेला दिसून येत नाही़ युवक क्रांती आघाडीकडे कट्टर कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी आहे, ती सध्या विखुरलेली आहे़ वडगाव विकास आघाडीने शहर विकासासाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचा दावा डॉ़ अशोक चौगुले यांनी केला़ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपची निवडणूक चाचपणी सुरू आहे़ बरोबर येणाऱ्या सर्वांना एकत्र करून पालिका निवडणूक लढविण्याचा निर्धार आहे़ तर डॉ़ चौगुले यांना पक्षप्रवेश दिल्यामुळे काही जुने कार्यकर्ते नाराज झालेत़ मात्र, पक्षप्रवेशाची हवा करण्यास भाजप यशस्वी झाले़ पालिका निवडणुका भाजप स्वबळावर की आघाडी करून लढणार याचे चित्र स्पष्ट नाही़ पूर्वाश्रमीचे यादव गटाचे समर्थक असणारे आऱ डी़ पाटील, अजय थोरात, बाळासो पाटील, आदींची यादव गटाविरोधात मोर्चेबांधणी सुरू आहे़ शिवसेना, मनसे यांची शहरात प्रभावी बांधणी आहे़ या पक्षांची भूमिका अद्यापही अस्पष्ट आहे़ शिवसेना शहराध्यक्ष व आमदार यांच्यात संवादाचा अभाव आहे़ मनसेच्यावतीने शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करण्यात येतो़ याचबरोबर माजी आमदार महादेवराव महाडिक, जयवंतराव आवळे, विनय कोरे, आदींना मानणारे कार्यकर्ते आहेत़ त्यांच्यासुद्धा भूमिका महत्त्वाच्या आहेत़