शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’ प्रक्रियाच बेकायदेशीर

By admin | Updated: January 26, 2016 01:23 IST

जिल्हा बॅँक : आयोगाची परवानगी न घेताच वारसदारांची वर्णी; सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा

कोल्हापूर : सहकारातील नवीन वटहुकुमामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक मंडळ चांगलेच धास्तावले आहे. पदावरून बाजूला जाण्याची नामुष्की येण्याऐवजी स्वत:हून बाजूला होण्यास सुरुवात झाली आहे. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांनी बॅँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असून, त्याठिकाणी अनुक्रमे रणजित कृष्णराव पाटील व अर्चना आनंदराव पाटील या वारसदारांची नेमणूकही केली असली, तरी ही नियुक्तीच बेकायदेशीर आहे. राजीनामे देत मंजूर करणे हे कायद्याच्या कक्षेत बसत असले, तरी त्याच बैठकीत व प्राधिकरणाची मान्यता न घेता स्वीकृत करणे बेकायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बॅँकेत झालेल्या गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅँकेने संचालक मंडळ बरखास्त केले असेल तर त्या संचालकांना दहा वर्षे कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढविता येणार नाही, असा नवीन वटहुकूम लागू झाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक मंडळ चांगलेच हादरून गेले आहे. या कायद्यामुळे जिल्हा बॅँकेच्या सध्याच्या दहा संचालकांच्या पदावर गंडांतर आले आहे. कायद्याच्या धाकाने ज्येष्ठ संचालक के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उर्वरित आठ संचालकही कायदेशीर सल्ला घेऊन राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. उर्वरितांमध्ये बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, निवेदिता माने, विनय कोरे, पी. जी. शिंदे, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, राजू आवळे, नरसिंग पाटील या विद्यमान संचालकांचा समावेश आहे. राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदावर स्वीकृत करून घेण्यासाठी सहकार प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागते. प्राधिकरणाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालीच नियुक्ती करावी लागते. त्यामुळे के. पी. पाटील, ए. वाय. पाटील व प्रा. जयंत पाटील यांच्या जागेवर करण्यात आलेल्या नियुक्त्या अडचणीत आल्या आहेत. सध्या जिल्हा बॅँकेत राष्ट्रवादीचे नऊ, काँग्रेसचे आठ, जनसुराज्य पक्षाचे दोन, तर शिवसेना-भाजपचे प्रत्येकी एक असे २१ संचालक कार्यरत होते. राष्ट्रवादीचे नऊपैकी पाच, कॉँग्रेसचे चार व जनसुराज्यचा एक असे दहा संचालक वटहुकुमात अडकणार आहेत. त्यामुळे बॅँकेतील सत्ता समीकरणात काँग्रेसने काही कुरघोडी करू नये म्हणून राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. त्यासाठीच ए. वाय. पाटील व के. पी. पाटील यांचे राजीनामे घेत त्याठिकाणी स्वीकृत म्हणून दोघांची नियुक्ती केली. वटहुकुमामुळे संचालकपद अपात्र ठरले तर राष्ट्रवादीकडे संजय मंडलिक यांच्यासह आठ, तर काँग्रेसकडे अनिल पाटील यांच्यासह सहा संचालक असे बलाबल राहते. सत्ता टिकवण्यासाठीच राष्ट्रवादीने सर्व आटापिटा केल्याची चर्चा सुरू आहे.