यंदाच्या हंगामास सूर्यफुलास उत्तम हवामान लाभल्याने सूर्यफूल पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यावर्षी विविध सुधारित सूर्यफूल बियांणाची शेतकऱ्यांनी पेरणी केली . शेतीमध्ये खोडवा ऊस पीक क्षेत्र व मोकळ्या जमिनीमध्ये सूर्यफुलांची लागवड करण्यात आली होती .
बाजारपेठेत गोड्या तेलाचे भाव प्रचंड स्वरूपात वाढू लागल्याने ग्रामीण भागात सूर्यफूल , भुईमूग या पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे .
फोटो ओळ - करवीर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून शेतीमध्ये उन्हाळी हंगामातील सूर्यफूल काढणीस वेग आला आहे .