शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे १४ हजार परीक्षार्थी देणार प्रवेश परीक्षा

By admin | Updated: May 3, 2017 16:28 IST

शिवाजी विद्यापीठाची तयारी पूर्ण; शुक्रवारपासून प्रारंभ

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 03 : शिवाजी विद्यापीठ यावर्षी विविध १५० पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ३९ प्रवेश परीक्षा शुक्रवार (दि. ५) ते मंगळवार (दि. ९) दरम्यान घेणार आहे. आॅनलाईन आणि आॅफलाईन या स्वरुपातील परीक्षांसाठी सुमारे १४ हजार परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चिती करण्यासाठी या प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांची सुरुवात शुक्रवारी (दि.५ मे) आॅफलाईन पद्धतीने होणार आहे. यात एम.ए. अथवा एम. एस्सी. भूगोल, मास कम्युनिकेशन, एम.एस्सी. केमिस्ट्री, बी. जे. सी, एम. जे. सी, एम. एस्सी. अ‍ॅग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट, एम. ए. भाषेच्या (विद्याशाखा बदल) अन्य शाखांचा समावेश आहे. शनिवारी (दि. ६ मे ) बी. लिब. सायन्स अँड इन्फर्मेशन सायन्स, एम. लिब सायन्स अँड इन्फर्मेशन सायन्स, एम. एस्सी. मायक्रोबायॉलॉजी, एम. एस्सी. फार्मास्युटिकल मायक्रोबायॉलॉजी, एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम. एस्सी. भूगर्भशास्त्र, एम. एस्सी. फिजिक्स, दूरशिक्षण केंद्र- एम. बी. ए. (एक्झिक्युटिव्ह) अँड एम. बी. ए., एम. एस्सी स्टॅटिस्टिक्स, एम. एस्सी. अ‍ॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फर्मेटिक्स. रविवारी (दि. ७ मे ) एम. एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी, एम. एस. डब्ल्यू. (रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट), एम. एस्सी. अल्कोहोल टेक्नॉलॉजी, एम. आर. एस. (मास्टर आॅफ रुरल स्टडीज), एम. बी. ए. (रुरल मॅनेजमेंट), एम. टेक. (रुरल टेक्नॉलॉजी) परीक्षा होईल. आॅनलाईन स्वरुपातील परीक्षा सोमवारी (दि. ८) सुरू होतील. यामध्ये एम. एस्सी. बॉटनी, एम. एस्सी. कॉम्प्युटर सायन्सेस, एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. एम. एस्सी. प्राणिशास्त्र, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, एन्व्हार्न्मेंटल बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. एन्व्हार्न्मेंटल सायन्स, एम. एस्सी. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अभ्यासकमाच्या परीक्षा मंगळवारी (दि. ९) होणार आहेत. यातील आॅनलाईन परीक्षांसाठी ३२७३, तर आॅफलाईन परीक्षांकरिता १०८१४ इतक्या परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे.