शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कलचाचणी १ लाख परीक्षार्थी देणार

By admin | Updated: January 25, 2017 00:37 IST

कृषी, सैन्यदल विषय : ९ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत कालावधी

कोल्हापूर : दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची करिअर करण्याबाबतची आवड, कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे मानसशास्त्रीय कलचाचणी दि. ९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत घेण्यात येईल. यावर्षी चाचणीच्या विषयामध्ये कृषी आणि सैन्यदल या क्षेत्रांसह २२० प्रश्नांचा समावेश केला आहे.कलचाचणीमध्ये गेल्यावर्षी कला-मानव्यविद्या, वाणिज्य, आरोग्य, तांत्रिक, ललित कला या पाच विषयांतील १५२ प्रश्न होते. यावर्षी चाचणीसाठी कृषी, सैन्यदल विषयांसह २२० प्रश्न असणार आहेत. त्यांची उत्तरे सोडविण्यासाठी दोन तासांचा कालावधी असणार आहे. कोल्हापूर विभागातून यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १ लाख ५१ हजार ५९६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. त्यातील सुमारे १ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी कल चाचणी देतील. आॅनलाईन पद्धतीने होणाऱ्या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना चार पर्याय असतील. यामध्ये ‘आवडते’, ‘खूप आवडते’, ‘खूप खूप आवडते’ आणि ‘आवडत नाही’ असे पर्याय असणार आहेत. त्यापैकी एकाची निवड परीक्षार्थींना करावी लागणार आहे. दहावीच्या केवळ नियमित विद्यार्थी-विद्यार्थिनींची कलचाचणी घेण्यात येणार आहे. पुनर्परीक्षार्थी आणि १७ क्रमांकाचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्यांचा समावेश असणार नाही. तयारी सुरू; काही ठिकाणी आॅफलाईन परीक्षाचाचणी आॅनलाईन पद्धतीने होईल. इंटरनेटची सुविधा नसलेल्या अपवादात्मक ठिकाणीच केवळ आॅफलाईन परीक्षा घेण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले. ते म्हणाले, चाचणीच्या नियोजनासाठी यावर्षी जिल्हानिहाय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांना चाचणीची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत शाळानिहाय बैठका घेण्यात येतील. सायबर कॅफे, इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या खासगी संस्थांतून चाचणी देता येणार नाही.