शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताचा प्रयत्न; डॉक्टर सागावकर ताब्यात-साई रुग्णालयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:01 IST

शाहूवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर परिसरातील साई रुग्णालयाच्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित डॉ. श्रीकांत दत्तात्रय सागावकर (वय ४३, मूळ गाव सागाव, ता. शिराळा, सध्या रा. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.

ठळक मुद्देव्हीनस कॉर्नर येथील साई रुग्णालयावर छापा । अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर परिसरातील साई रुग्णालयाच्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित डॉ. श्रीकांत दत्तात्रय सागावकर (वय ४३, मूळ गाव सागाव, ता. शिराळा, सध्या रा. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रुग्णालयावर छापा टाकून ही कारवाई केली. दोन दिवसांत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिलीच मोठी कारवाई केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या शाहूवाडीतील तरुणावर आणि संबंधित डॉ. सागावकर यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.पोलिसांनी सांगितले, शाहूवाडी तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. बदनामीच्या भीतीने त्यांनी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने तिचा गर्भपात करण्यासाठी तिला व्हीनस कॉर्नर येथील साई रुग्णालयात शनिवारी दुपारी दाखल केले. या प्रकाराची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने सायंकाळी सहाच्या सुमारास संबंधित रुग्णालयात छापा टाकला.

यावेळी एका रूममध्ये बेडवर पीडित मुलगी झोपली होती. तिला गर्भपात होण्यासाठी डॉक्टरांनी इंजेक्शन दिले होते. पोलिसांनी तत्काळ तिला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तिची वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी संबंधित रुग्णालयात पंचनामा करून डॉ. सागावकर यांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी रुग्णालयातील परिचारिका, पीडितेचे नातेवाईक, अन्य काही रुग्णांच्या नातेवाइकांचे जबाब घेतले.तरुणावरही गुन्हा?बेकायदेशीरपणे गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे, हे माहीत असतानाही डॉ. सागावकर यांनी गर्भपाताचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तसेच पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAbortionगर्भपात