शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

यंत्रमाग संस्थाधारकांना थकबाकी हप्त्यासाठी ‘अभय’

By admin | Updated: March 5, 2017 23:32 IST

अधिकाऱ्यांचाच हात : तीनशे कोटींसाठी निव्वळ तीन कोटी वसुलीची बोळवण

इचलकरंजी : कमी गुंतवणुकीत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने वस्त्रोद्योगामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या हमीवर राष्ट्रीय सहकार निगमकडून कोट्यवधी रुपयांचे अर्थसाहाय्य आणि शासनाचे भागभांडवल देण्यात आले. मात्र, त्याची विविध संस्थांकडे ६३५.७७ कोटी रुपये थकबाकी आहे. यापैकी कोल्हापूर जिल्हा संस्थांकडे ३०० कोटी रुपयांची वसुली असून, त्यासाठी तीन ते साडेतीन कोटींच्याच हप्त्याची वसुली करण्याचा घाट शासनाच्या अधिकाऱ्यांकडून घातला जात आहे.वस्त्रोद्योगात यंत्रमाग संस्था स्थापन करण्यासाठी साधारणत: ५० लाख रुपयांची गुंतवणूक लागते. संस्थेकडील ४८ यंत्रमागाच्या कारखान्यातून कामगार, जॉबर, कांडीवाला, दिवाणजी, घडी कामगार, वहिफणी असा थेट रोजगार दिला जातो. याशिवाय यंत्रमागावर उत्पादित कापडापासून सायझिंग व प्रोसेसिंग उद्योग, गारमेंट उद्योगालाही चालना मिळते. तेथेही रोजगार उपलब्ध होतो. म्हणून राज्य शासनाने साधारणत: वीस वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रात यंत्रमाग सोसायट्या स्थापन करून त्यांना शासकीय भागभांडवल व राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) कडून अर्थसाहाय्य देण्याचे निश्चित केले. त्यासाठी दहा टक्के स्व:भांडवल, वीस टक्के शासनाचे भागभांडवल, ७० टक्के एनसीडीसीचे अर्थसाहाय्य असा ढाचा निश्चित करण्यात आला.या यंत्रमाग सोसायट्यांना सुलभ पद्धतीने अर्थसाहाय्य मिळते आणि त्याच्या परतफेडीसाठी शासनाचा फारसा तगादा नसतो. हे लक्षात आल्यामुळे मध्यंतरी यंत्रमाग सोसायट्या स्थापन करण्याचे पेवच फुटले. यंत्रमागाबरोबरच सायझिंग, आॅटोलूम, प्रोसेसिंग अशा अधिक गुंतवणुकीच्या संस्थासुद्धा स्थापन झाल्या. राज्यभरामध्ये स्थापन झालेल्या संस्थांपैकी सर्वाधिक संस्था इचलकरंजी व परिसरामध्ये नोंदणी होऊन स्थापन झाल्या. या संस्थांकडे ३०० कोटी रुपयांची थकबाकी असून, त्यामध्ये २४ संस्थांकडे २०० कोटींची थकबाकी आहे, अशी माहिती आता उजेडात आली आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील या संस्थांमध्ये प्रामुख्याने प्रोसेसर्स व आॅटोलूम संस्थांचा समावेश आहे. विशेषत: या सर्व संस्था बड्या मंडळींच्या असल्यामुळे संस्थांकडील वसुलीसाठी शासनाकडून बडगा उगारण्यात आला नसल्याने ही थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता शासनाच्या वस्त्रोद्योग व सहकार खात्यामार्फत विशेष मोहीम राबवून सक्तीने वसुली करण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग उपसंचालक किरण सोनवणे यांनी सांगितले आहे. एकूणच ३०० कोटी रुपयांची थकबाकी असूनसुद्धा त्याच्या वसुलीसाठी तीन ते साडेतीन कोटी रु. इतकेच वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. एवढ्या मोठ्या रकमेच्या वसुलीसाठी निव्वळ एक टक्का उद्दिष्ट ठेवणे म्हणजे शासनाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी बोळवण केल्याचाच प्रकार असल्याचे येथे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)