शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

गांधीनगरच्या व्यापाऱ्याचे अपहरण

By admin | Updated: January 8, 2016 01:29 IST

चौघांचे कृत्य : तपासासाठी पोलीस पथके रवाना; गुन्ह्याची नोंद नाही

गांधीनगर : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गांधीनगर बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी श्यामलाल कन्हैयालालाल निरंकारी (रा. निरंकारी कॉलनी, वळिवडे, ता. करवीर) यांचे गुरुवारी पहाटे अज्ञातांनी अपहरण केले. तावडे हॉटेल परिसरात हा प्रकार घडला. अल्टो कारने आलेल्या चौघांनी अपहरण केल्याचे समजते. या घटनेची गांधीनगर पोलिसांत नोंद नसली तरी अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके निपाणी, बेळगाव, मिरज, म्हैशाळ येथे रवाना झाली आहेत.गांधीनगर बाजारपेठेत श्यामलाल यांचे होजिअरीचे दुकान आहे. निरंकारी ट्रस्टमध्ये योगदान दिलेले श्यामलाल सेवाव्रती आहेत. नेहमीप्रमाणे पहाटे तावडे हॉटेल परिसरात ते फिरायला गेले असता पाळत ठेवून असलेल्या चौघाजणांनी त्यांना मारुती आल्टो कारमध्ये जबरदस्तीने बसविले व पोबारा केला. याबाबतची माहिती घटना पाहणाऱ्यांनी (र समजताच निरंकारी यांच्या घरी वरिष्ठ पोलिस अधिकारी आले. त्यांनी सर्व माहिती घेताच निपाणी, बेळगाव म्हैशाळ, मिरज येथे पोलिसांची पथके रवाना केली. रात्री उशिरापर्यंत अपहरणकर्ते सापडले नव्हते. तावडे हॉटेल परिसरात असलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यामधील फुटेजवरून तपास सुरू आहे. दरम्यान, अपहरणकर्त्यांचा शोध बेळगाव पोलिसही घेत आहेत. याबबत रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलिसांत फिर्याद दाखल झाली नव्हती. तपासाबाबत कमालीची गोपनियता पोलिसांनी बाळगली आहे.गांधीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड अपहरणकर्त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)दोन कोटींच्या खंडणीची मागणीअपहरण झालेल्या श्यामलाल निरंकारी यांचे अपहरण झाल्याचे वृत्त पसरताच त्यांच्या घरासमोर जमाव जमला. याचवेळी निरंकारी कुटुंबीयांना अपहरणकर्त्यांचा फोन आला. अपहरणकर्त्यांनी श्यामलाल यांच्या सुटकेसाठी दोन कोटी रुपये द्या अन्यथा तुमच्या माणसाचे बरे-वाईट होईल, पोलिसांत गेला तर याद राखा, अशी धमकी दिल्याची चर्चा घरासमोरील जमावात होती.दोन वर्षांतील तिसरी घटना गेल्या दीड ते दोन वर्षांतील ही गांधीनगर बाजारपेठेतील अपहरणाची तिसरी घटना असल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली आहे. निरंकारी कुटुंबीयांना येणाऱ्या धमक्यांमुळे ते चिंताग्रस्त आहेत.