शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत युवकाचा दगडाने ठेचून खून

By admin | Updated: April 24, 2016 00:53 IST

चौघांवर संशय : युवक तारदाळचा; पाच दिवसांपूर्वी झाले होते अपहरण

इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील पाच दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. अजित वसंत वाघमारे (वय ३०) असे त्याचे नाव आहे. अजितचा मृतदेह कर्नाटकमधील कागवाडजवळ एका उसाच्या शेतात आढळून आला. मात्र, चेहरा ओळखत नसल्याने अंगातील कपड्यावरून तो असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस रात्री उशिरापर्यंत खातरजमा करीत होते. याबाबत पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप अधिकृत माहिती नसल्याचे बेजबाबदार उत्तर दिले. त्याचवेळी या प्रकरणातील आरोपींचा चार दिवसांपासून पोलिस शोध घेत आहेत. मात्र, अद्याप कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. हा खून वर्चस्ववादातून झाल्याचे बोलले जात आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, तारदाळमधील कृष्णानगर येथे राहणाऱ्या अजित वाघमारे याच्या घरात १९ एप्रिलला दुपारी घुसून चौघांनी तोडफोेड करीत मोटारसायकलवरून त्याचे अपहरण केले होते. तो घरी न परतल्याने त्याची पत्नी दीपाली वाघमारे यांनी अमोल माळी, सूरज शिर्के यांच्यासह चौघांनी पती अजित वाघमारे यांचे अपहरण केल्याची फिर्याद शहापूर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, वाघमारे यांचा घातपात झाल्याची चर्चा शहापूर, तारदाळ परिसरात दबक्या आवाजात सुरू होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जागे झालेल्या शहापूर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी पथके कर्नाटककडे रवाना झाली. त्यानंतर शनिवारी या पथकाला सुगावा लागला आणि अजित वाघमारे यांचा मृतदेह कागवाडजवळील शिळेवाडी येथे उसाच्या शेतात मृतदेह आढळून आला. मृतदेह दगडाने ठेचलेल्या स्थितीत होता. कपड्यावरून तो अजित असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. तरी पोलीस रात्री उशीरापर्यंत खातरजमा करीत होते. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार खून झालेला अजित वाघमारे हा गवंडी कामगार दीपक मस्तुद याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी होता. तसेच अजितच्या पत्नीने ज्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे, ते अमोल माळी व सूरज शिर्के हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)