शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

संक्षिप्त.. क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:39 IST

कोल्हापूर : गडमुडशिंगी ते सांगवडे मार्गावर रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाने सोमवारी रात्री धडक दिल्याने अरुण नरसगोंडा पाटील (वय ४७, ...

कोल्हापूर : गडमुडशिंगी ते सांगवडे मार्गावर रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाने सोमवारी रात्री धडक दिल्याने अरुण नरसगोंडा पाटील (वय ४७, रा. वसगडे, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

विष प्राशन केलेल्याचा मृत्यू

कोल्हापूर : बोलोली (ता. करवीर) येथील पांडुरंग सखाराम बाटे (वय ४०, रा. बोलोली) यांचा विष प्राशन केल्याने मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांना अत्यावस्थेत सोमवारी रात्री सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची सीपीआर पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

पाय घसरून पडल्याने वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूर : घरात ओल्या फरशीवरून पाय घसरून पडल्याने कृष्णकुमारी गंगाराम लाड (वय ७७, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यास मुक्का मार लागल्याने बेशुद्धावस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

दुचाकी घसरून जखमी

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामोड येथे भरधाव दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्याने सुभाष धोंडिराम पाटील (वय ३५ रा. येवती) हा गंभीर जखमी झाले. ते सोमवारी रात्री खामकरवाडीकडून येवतीकडे दुचाकीवरून जात असताना धामोडनजीक ही दुर्घटना घडली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(तानाजी)