शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आप्पा-दादांची सत्तेची ‘खेळी’ थोडक्यात हुकली

By admin | Updated: November 3, 2015 00:45 IST

महापालिका निकाल : काँग्रेस-राष्ट्रवादीला यश; शिवसेनेचा धुव्वा

विश्वास पाटील --कोल्हापूर--खासदारकी, आमदारकी ते जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकत ‘राजाराम’ आणि ‘गोकुळ’वर सत्ता काबीज करीत जिल्ह्याच्या राजकारणात एक हाती नेतृत्वाची मोहर उमटविणाऱ्या आमदार महादेवराव महाडिक ऊर्फ आप्पा आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील ऊर्फ दादा यांची महापालिका काबीज करण्याची ‘खेळी’ केवळ आठ जागांनी हुकली.कोल्हापूर महापालिकेवर अनेक वर्षे सत्ता गाजविणारे महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी आणि केव्हाही दोन आकडी संख्या न गाठलेले भाजप यांनी एकत्र येऊन कोल्हापूरच्या राजकारणाला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला. ही खेळी करताना ८१ जागांपैकी ताराराणी आघाडीने ४० जागा लढविल्या, तर भाजपने ३७ जागा लढविल्या. उर्वरित चार जागा मित्रपक्षांना सोडल्या होत्या. यापैकी ताराराणीने १९, तर भाजपने १४ जागा जिंकल्या. निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या या पक्षांना केवळ आठ जागा बहुमतासाठी कमी पडल्या. या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व जागा लढवित केवळ अनुक्रमे २७ व १५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिल्यानेच त्यांचा विजय म्हणावा लागेल; अन्यथा आप्पा-दादांच्या आघाडीने कडवी झुंज देत शिखर गाठले होते. ती संधी थोडक्यात हुकली.ही निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी ठरली होती. भाजप-शिवसेनेच्या राज्यस्तरीय संबंधावर परिणाम करणारी निवडणूक म्हणूनही तिच्याकडे पाहिले गेले. कारण याच निवडणुकीच्या प्रचारात या दोन सत्तेतल्या पक्षांनी एकमेकांना शड्डू ठोकले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या या निवडणुकीत मुख्यत: भाजपचे भवितव्य पणाला लागले होते; परंतु मतदारांनी भाजपच्या पारड्यात संमिश्र यश टाकले. शिवसेनेचा दारूण पराभव झाला. या पक्षाला कशाबशा चारच जागा मिळाल्या. ‘शिवसेनेपेक्षा जास्त जिंकायचे’ भाजपचे स्वप्न साकार झाले तरी त्यांना महापालिकेवर मात्र सत्तेचे कमळ फुलविता आले नाही. विधानसभा निवडणुकीत जे लोकमानस होते तेच वर्षभरानंतर कायम आहे का याचीही लिटमस टेस्ट म्हणून या निकालाकडे पाहिले गेले; परंतु त्यामध्ये भाजपचा जनाधार कमी झाल्याचे दिसले. या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. भाजपने काही मटकेवाले, गुंडांना उमेदवारी दिल्याच्या आरोपामुळे जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले.याउलट काँग्रेसचा जो मूळ जनाधार आहे, तोच त्यांच्या पाठीशी राहिल्याने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देऊनही काँग्रेसला इतके चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपाही त्यांनी या निकालाने काढला. लोकसभेला खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज यांची मदत घेऊन विजय मिळविला व विधानसभेला मात्र लगेच त्यांच्या विरोधात अमल महाडिक उतरले. काँग्रेसच्या -/पान ६ वरविधानसभेची भरपाईविधानसभा निवडणुकीत दहापैकी सहा जागा शिवसेनेला आणि प्रत्येकी दोन भाजप व राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची स्थिती काय राहणार याबद्दल उत्सुकता होती; परंतु या निवडणुकीने काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकल्याचे चित्र शहरात दिसले.