शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्ड मजुरांना सक्तीचे

By admin | Updated: April 8, 2015 00:34 IST

मग्रारोहयो योजना : मानधनात पारदर्शकता आणण्यासाठी उपक्रम

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे मानधन (मजुरी) बँकेत जमा करताना पारदर्शकता यावी, यासाठी या योजनेंतर्गत येणाऱ्या मजुरांना आधारकार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे या मजुरांकडून आधारकार्ड काढण्याचे काम सुरू झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल व अकुशल कामाचा समावेश होतो. यामध्ये १२० दिवस काम उपलब्ध करून देण्याचा नियम आहे. किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून दिलेच पाहिजेत, असा कायदा आहे. मजूर जेवढे दिवस काम करतील, त्या दिवसाचे मानधन राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसे मानधन जमाही केले जाते. मात्र, काही मजुरांचा बँक खाते नंबर चुकीचा असतो. तसेच काहीजणांचे खाते बंद झालेले असते. त्यामुळे संबंधित यंत्रणेला मजुरांच्या खात्यात पैसे जमा करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ासेच यात पारदर्शकता दिसून येत नाही. त्यामुळे खात्यात पैसे जमा करताना पारदर्शकता यावी, यासाठी आता मजुरांना आधारकार्ड सक्तीचे केले आहे. मजुरांनी आधारकार्ड काढून त्याचा नंबर राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेनंबरशी संलग्न करून घ्यावयाचा आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेमार्फत मजुरांचे मानधन खात्यात जमा करताना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाहीत.११ हजार नोंदींत मजुरांजवळ आधारकार्ड नाहीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात तब्बल ६६ हजार २८७ कुटुंबे नोंदणी झाली आहेत. मात्र, गतवर्षी यातील १४ हजार कुटुंबे कामावर हजर होती. त्याची संख्या २१ हजार एवढी आहे. त्यातील ४८ टक्के मजुरांनी आधारकार्ड काढले आहे, तर उर्वरित ११ हजार मजूर आधारकार्डपासून वंचित आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी आधारकार्ड आवश्यक असल्याने संबंधित लाभार्थ्यांनी आधारकार्ड काढावे. त्यामुळे संबंधितांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेता येईल.- अशोक भारती, ‘मग्रारोहयो’चे गटविकास अधिकारी (सिंधुदुर्ग).