शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या सवलतीसाठी ‘आधार’ कार्ड

By admin | Updated: February 6, 2015 00:38 IST

दिवाकर रावते : बोगस लाभार्थींना चाप बसेल; एस.टी.मधून होणार शेतीमाल वाहतूक

कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.बसमध्ये पासऐवजी फक्त आधार कार्ड दाखवून प्रवास करता येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या बदललेल्या नियमामुळे पास काढण्याचा त्रास कमी होईल, शिवाय बोगस ज्येष्ठ नागरिकांनाही चाप बसेल, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला. पुढीळ काळात एस.टी.बसमध्ये पाठीमागील सीट ही १० ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, एस. टी. महामंडळाला प्रत्येक वर्षी दोन हजार कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी विविध पातळीवर बैठका घेऊन प्रयत्न सुरू केला आहे. बसस्थानकांच्या २०० मीटरच्या परिसरात एस.टी.चे प्रवासी नेणाऱ्या खासगी गाड्यांच्या मालकांवर आर.टी.ओ., एस. टी. महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस यांच्या मदतीने कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत. प्रत्येक वर्षी एस.टी.ला तीन हजार ६०० कोटी डिझेल लागते. हा खर्च काही प्रमाणात भरून काढण्यासाठी एस.टी.बसमधून शेतीमाल वाहतुकीला परवानगी देण्याचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. एस.टी.तील ६० टक्के कर्मचारी हे मूळव्याधीने ग्रस्त आहेत. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दर सहा महिन्यांनी एस.टी.तील कर्मचाऱ्यांची आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला महिन्यातून पाचवेळा ओव्हर टाईम करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे त्याला थोडी आर्थिक मदत होईल. शिवाय सर्वांच्या कामावरील ताण कमी होईल. स्थानकांमध्ये बदल करून, शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. धोरणात्मक बाबीत अडचणी एस. टी. महामंडळाचे संचालक बरखास्त करण्यासाठी एक महिन्यापूर्वी नोटीस पाठवावी लागते. त्याप्रमाणे आम्ही संबंधितांना नोटिसाही पाठविल्या. मात्र, त्यांनी न्यायालयाद्वारे त्यावर स्थगिती आणली आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये अडचणी येत असल्याची रावते यांनी यावेळी कबुली दिली. तसेच कोल्हापुरातील महानगरपालिका निवडणुकीतील युतीबाबत विचारले असता जिल्ह्याचे संपर्कप्रमुख दुधवाडकर, स्थानिक आमदार व पदाधिकारी युतीबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.