शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा खून; राजारामपुरीतील घटना, संशयित आरोपीस अटक

By उद्धव गोडसे | Updated: May 12, 2024 14:32 IST

संशयित आरोपी सन्मेष आणि दिनेश हे दोघे मित्र होते. दिनेश हा तीन दिवसांपासून सनमेश याच्या राजारामपुरी येथील फ्लॅटमध्ये राहत होता.

कोल्हापूर : फ्लॅटमध्ये बसून दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा गळा दाबून आणि मारहाण करून खून केला. हा प्रकार राजारामपुरी येथील सातव्या गल्लीतील कोटणीस हाइट्स येथे रविवारी (दि. १२) पहाटेच्या सुमारास घडला. दिनेश अशोक सोलाकुरकर (वय 34 रा. रेखानगर, गारगोटी, ता. भुदरगड) असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी सन्मेश अशोक तेंडुलकर (वय ५४, रा. कोटणीस हाइट्स, राजारामपुरी) याला घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत सुजाता अशोक सोलांकुरकर (वय 55, रा. रेखा नगर गारगोटी) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी सन्मेष आणि दिनेश हे दोघे मित्र होते. दिनेश हा तीन दिवसांपासून सनमेश याच्या राजारामपुरी येथील फ्लॅटमध्ये राहत होता. शनिवारी रात्री उशिरा दोघे हॉलमध्ये बसून मद्यप्राशन करीत होते. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर संमेश याने शिवीगाळ करून दिनेश याला मारहाण केली. तसेच दोन्ही काखेतून हात घालून मान दाबल्याने दिनेश याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरूनच संशयित आरोपी संमेष तेंडुलकर याला ताब्यात घेतले.