कोरोनाची टांगती तलवार मानगुटीवर असतानाही हलकर्णीकरांनी ग्रामपंचायतीला करवसुलीमध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे आर्थिक वर्षात जवळपास ९७ टक्के घर व पाणीपट्टी वसुली करण्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. घर व पाणी अशा दोन्ही करांची सुमारे ३२ लाखांची वसुली यावर्षी होती. त्यापैकी साधारण ३१ लाख ४० हजारांची वसुली येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे. परगावी असणाऱ्यांची घरपट्टी व नेहमी पंचायतीला टोलवणाऱ्या काहींची पाणीपट्टी अशी ६० हजारांची वसुली अद्यापही बाकी आहे. थकबाकीदार असणाऱ्या नळधारकांचे पाणी कनेक्शन बंद करण्यात आले आहे.
वसुलीसाठी ग्रा. पं. लिपिक बापू वाजंत्री यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी गेले दोन महिने विशेष परिश्रम घेतले.
ग्रामस्थांनी आर्थिक अडचणीतून मार्ग काढत ग्रामपंचायतीला वसुली देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीनेही पथदिवे, पाणी व गटारींची स्वच्छता आदी नागरी सुविधा दर्जेदार देणे गरजेचे बनले आहे.