शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा तटबंदीसाठी ९३ लाख

By admin | Updated: March 27, 2015 00:29 IST

‘स्थायी’चा निर्णय : निधीची प्रथमच तरतूद; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करणार

कोल्हापूर : रंकाळ्याच्या पश्चिम बाजूने कोसळणाऱ्या तटबंदीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी ९३ लाखांची तरतूद करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सदस्य सचिन चव्हाण यांनी दिली. कामाची निविदा मंजूर केली असून, भिंतीची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याची सक्त सूचना प्रशासनास दिल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. वर्षापूर्वी रंकाळ्याच्या ढासळलेल्या तटबंदीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, निधीअभावी हे काम रेंगाळले. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांत तब्बल ४० फुटांपेक्षा अधिक तटबंदी कोसळली. याप्रकरणी सामाजिक संघटना, माध्यमातून आवाज उठल्यानंतर स्थायी समिती व महापालिका सभेत तातडीने काम करण्याच्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात एक रुपयाचीही अद्याप तरतूद झालेली नव्हती. दरम्यान, रंकाळ्याची तटबंदी ढासळण्याची मालिका सुरूच राहिल्याने प्रशासनाबाबत प्रचंड संताप व्यक्त होत होता. रंकाळ्याची पश्चिम बाजूची संपूर्ण तटबंदीच नाहीशी होण्याच्या मार्गावर असल्याने जोरदार टीका होऊ लागल्यानंतर प्रशासनास जाग आली. त्यामुळे ‘स्थायी’ने पैशाची जोडणी करून तातडीने निविदा मंजूर केली आहे. लवकरच तटबंदीच्या बांधकामास सुरुवात होणार आहे. रंकाळ्याच्या पश्चिम बाजूची ९० मीटरची तटबंदी कोणत्याही वेळी ढासळू शकते. ही संपूर्ण तटबंदी काढून कॉँक्रीटची भक्कम भिंत उभारावी, त्यापुढे जुन्या ‘अल्सर’ पद्धतीने उतरंडीसारखी दगडी भिंत उभारावी, शेजारील झाडांची मुळे व भुसभुशीत जमीन यांमुळे भिंत बांधताना विशेष काळजी घ्यावी, झाडांच्या मुळांचा धोका भिंतीला होऊ नये, यासाठी कॉँक्रीटची भक्कम भिंत बांधावी, त्यापुढे दगडी भिंत उभारावी, ही भिंत धरणाच्या सांडव्याप्रमाणे उतरती असावी, जेणेकरून ती पाण्याचा दाब सहन करील, अशा सूचना इंजिनिअर्स अ‍ॅँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याची अंमलबजावणी करण्याची मागणी रंकाळाप्रेमींतून होत आहे. (प्रतिनिधी) ४रंकाळा प्रदूषणमुक्तीसंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या आहे अथवा प्रस्तावित आहेत यासंबंधी तपशीलवार प्रतिज्ञापत्र येत्या एक महिन्यात सादर करा, असे आदेश गुरुवारी राष्ट्रीय हरित लवादाचे न्या. व्ही. आर. किनगावकर व अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले. पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे. ४रंकाळा प्रदूषणप्रश्नी येथील नागरिक सुनील केंबळे यांनी अ‍ॅड. वल्लरी जठार यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर लवादाने हा आदेश दिला. ४शहराचे ऐतिहासिक वैभव असलेला रंकाळा तलाव मरणासन्न अवस्थेत असून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रंकाळ्याला मरणकळा आल्या आहेत. रंकाळ्यासभोवती असलेल्या गृहसंकुल प्रकल्पातून रंकाळ्यात सांडपाणी मिसळते त्याठिकाणी सांडपाण्याची ड्रेनेजची सोय नाही, असा दावा याचिकेत केला. ४उच्च न्यायालयात पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात जी जनहित याचिका चालू आहे, त्यामध्ये रंकाळा तलावाचा समावेश आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यावर महापालिकेचे वकील धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयातील जनहित याचिका ही फक्त पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात असून, त्यामध्ये रंकाळा तलावाचा समावेश नसल्याचे सांगितले.