शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

जिल्ह्यात ९ लाख ४५ हजार रोपांची लागवड

By admin | Updated: July 8, 2017 00:10 IST

वनमहोत्सव सप्ताह : प्रभुनाथ शुक्ला यांची माहिती; राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : राज्यात चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात वनमहोत्सव सप्ताहात ९ लाख ४५ हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. ही मोहिम प्रभावीपणे हाती घेण्यात आली असून उद्दिष्टाच्या ११३ टक्के काम केल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.शुक्ला म्हणाले, यंदाच्या वृक्षलागवड मोहिमेस १ जुलै रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. गेली सात दिवस जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम प्रभावीपणे हाती घेण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यास आठ लाख ३८ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली खड्ड्यांचे तसेच रोपे लावण्याचे नियोजन केले होते. गेल्या आठवडाभरात वन व सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच अन्य सर्व विभागांच्या सहकार्यामुळे आजअखेर ९ लाख ४५ हजार १० झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत वनविभाग व इतर विभागाची आॅनलाईन खड्डे नोंदणी ८ लाख ८९ हजार ६१६ इतकी झाली होती; तर ५६ हजार ५२२ खड्ड्यांची आॅफलाईन नोंदणी झाली होती. या खड्ड्यामध्ये १ ते ७ जुलै या कालावधीत वृक्षारोपणासाठी वनविभागाने आवश्यक रोपे उपलब्ध करून दिली. वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वितेसाठी वनविभागाने गावपातळीवरही जनजागृती करून सर्व घटकांचा सक्रिय सहभाग घेतला आहे. रोपखरेदीतून वनविभागाला मिळाले पावणेदोन लाख कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज, इत्यादी शहरांमध्ये २५ जून ते ५ जुलैपर्यंत प्रत्येकी ४ वनमहोत्सव केंद्रे उभारली होती. त्यामार्फा ५ हजार ५५४ व ६१ संस्थांनी २१ हजार ६३४ रोपे खरेदी केली; त्यामुळे शासनास १ लाख ८३ हजार १०१ रुपयांचा महसूल मिळाल्याचेही शुक्ला यांनी सांगितले. ४ हजार साईट्सवर ६५ हजार लोकांनी भरली माहितीवनमहोत्सव सप्ताहात ४ हजार १०२ साईट्सवर ६५ हजार ९७८ लोकांनी ८ लाख ८८ हजार ४८८ इतकी रोपे लावण्याची आॅनलाईन माहिती भरली आहे. तसेच ८५ साईटवर ३ हजार ९९९ लोकांनी ५६ हजार ५२२ इतके वृक्षारोपण केले आहे. यामुळे जिल्ह्यात एकंदर ९ लाख ४५ हजार १० इतकी झाडे लागली गेली.