कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी चुरशीने ९७.३८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान शिरोळ व कागल तालुक्यात ९८.९६ टक्के झाले असून मतमोजणी आज, शनिवारी होत आहे. साधारणत: दुपारी चारपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित आहे. बॅँकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे. शिक्षक बँकेसाठी राजाराम वरूटे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ शिक्षक संघ पॅनेल, प्रसाद पाटील व कृष्णात कारंडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल व एस. व्ही. पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेल अशी निकराची व प्रतिष्ठेची तिरंगी लढत झाली. गेले आठ-दहा दिवस प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांनी सारे शिक्षणक्षेत्र ढवळून निघाले. शुक्रवारी बारा तालुक्यांतील वीस केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली.
शिक्षक बँकेसाठी चुरशीने ९७.३८ टक्के मतदान
By admin | Updated: April 4, 2015 00:28 IST